बापरे! खरातने अशे कित्येक कांड केलेत… ‘माझं ऐकलं नाही, तर सर्वनाश करेन’, सिन्नरला 14 वा गुन्हा!

जादुटोण्याची भीती दाखवून अशोक खरातने सिन्नरच्या शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी 14 वा गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Ashok Kharat

Ashok Kharat

Ashok kharat : महिलांच्या शोषण प्रकरणी भोंदू अशोक खरातची (Ashok kharat) एसआयटीकडून चौकशी सुरु असतानाच अशोक खरातचे रोजच नवनवीन कारनामे समोर येत असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आणखी एक नवा कारनामा समोर आलायं. खरातचं फार्महाऊसलेली जमीन सिन्नरच्या शेतकऱ्याला जादुटोण्याची भीती दाखवून हडपल्याचा गुन्हा सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालायं. त्यामुळे आता या अशोक खरातने नेमके कित्येक कांड केलेत? याची चर्चा सर्वत्र सुरु झालीयं.

युद्ध संपलं, पण ट्रम्प यांचा दरारा सुरूच; इराणला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांवर 50 % टॅरिफचा झटका

ईशान्येश्वर मंदिर उभारणीसाठी मला जमीन द्या, अन्यथा तुमच्यावर जादूटोणा करुन कोप करेल, सर्वनाश करेल अशी धमकी देत अशोक खरातने तब्बल 16.5 एकर जमीन अवघ्या 15 लाख रुपयांत खरेदी केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी एका शेतकऱ्याने सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ईशान्येश्वर मंदिर परिसरात असलेलं फार्म हाऊस याच जमीनीवर असल्याचंही समोर आलंय.

हजारोंचा मृत्यू अन् 55 लाख कोटींचा धूर; इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा धडकी भरवणारा हिशोब

नोव्हेंबर 2003 ते फेबुवारी 2004 दरम्यान शेतकऱ्याची ही फसवणूक झाली आहे. ईशान्येश्वर मंदिर फार्म हाऊससाठीच्या जमीनीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलायं. मंदिर उभारणीच्या नावाखाली भूलथापा देत फसवणूक केलीयं. या प्रकरणी खरातवर जादूटोणा अन् फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून जमीन न दिल्यास दैवी कोप होण्याची घातली भीती घातली होती. त्यामुळे शेतकऱ्याने अशोक खरातला ही फार्म हाऊसची जमीन दिल्याचं समोर आलंय.

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच! आज 11 आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कुणाला कुठं संधी?

दरम्यान, आज पुन्हा अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार असून तपास अधिकाऱ्यांनी तिसऱ्या गुन्ह्यात खरातला वर्ग केलं आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याप्रकरणी खरातला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याने जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवर अत्याचार केला होता.

Exit mobile version