युद्ध संपलं, पण ट्रम्प यांचा दरारा सुरूच; इराणला शस्त्रे पुरवणाऱ्या देशांवर 50 % टॅरिफचा झटका
Donald Trump इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम जाहीर होऊन १२ तास उलटले नाहीत आणि मध्य पूर्वेत पुन्हा हल्ले सुरू झाले आहेत.
Trump warns of 50% tariffs on countries supplying weapons to Iran : इराणसोबत युद्धविराम जाहीर होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘टॅरिफ बॉम्ब’ने जगाला हादरवून सोडले आहे. ‘ज्या देशांनी इराणला शस्त्रास्त्रे देऊन मदत केली, त्यांच्यावर आता 50 टक्के आयात शुल्क (Tariff) लादले जाईल,’ अशी गर्जना ट्रम्प यांनी केली आहे. जो कोणता देश इराणला लष्करी शस्त्रे पुरवेल, त्या देशाच्या अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सर्व मालावर तात्काळ 50% शुल्क आकारले जाईल आणि याची अंमलबजावणी त्वरित होईल. यात कोणतीही सूट किंवा सवलत दिली जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने ट्रुथ सोशल पर पोस्ट किया, "ईरान को सैन्य हथियार सप्लाई करने वाले देशों पर, यूनाइटेड स्टेट्स ऑफ़ अमेरिका को बेचे जाने वाले किसी भी और सभी सामान पर, तुरंत 50% टैरिफ लगाया जाएगा, जो तुरंत लागू होगा। इसमें कोई छूट नहीं होगी।" pic.twitter.com/8XJ8pecDhV
— ANI_HindiNews (@AHindinews) April 8, 2026
आम्ही इराणसोबत शुल्क आणि निर्बंधांमधील सवलतीबाबत वाटाघाटी करत आहोत आणि त्या पुढेही चालू राहतील. 15 मुद्द्यांपैकी अनेक मुद्द्यांवर आधीच सहमती झाली आहे. जो कोणता देश इराणला लष्करी शस्त्रे पुरवेल, त्या देशाच्या अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सर्व मालावर तात्काळ 50% शुल्क आकारले जाईल आणि याची अंमलबजावणी त्वरित होईल. यात कोणतीही सूट किंवा सवलत दिली जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.
हजारोंचा मृत्यू अन् 55 लाख कोटींचा धूर; इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा धडकी भरवणारा हिशोब
यापुढे युरेनियमचे संवर्धन नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या भविष्यातील संबंधांबाबत पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. ट्रम्प यांच्या मते, आता इराणमध्ये युरेनियमचे संवर्धन पूर्णपणे थांबवले जाईल आणि जमिनीखाली गाडलेले अण्वस्त्रांचे अवशेष अमेरिका स्वतः खणून काढेल. इराणच्या अणू तळांवर अमेरिकन सॅटेलाईटची (Space Force) चोख नजर असून, तेथील परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जर इराणने अमेरिकेच्या सर्व अटी मान्य केल्या, तर दोन्ही देश मिळून काम करतील. या बदल्यात इराणवर लादलेले कठोर आर्थिक निर्बंध शिथिल केले जातील आणि आयात शुल्कात (Tariff) कपात करण्यासाठी चर्चा सुरू केली जाईल. इराणने सहकार्य केल्यास त्यांच्यासाठी जागतिक व्यापाराची द्वारे पुन्हा उघडण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. Trump warns of 50% tariffs on countries supplying weapons to Iran
60 सेकंदांत पाकड्यांची अब्रू गेली; ‘ड्राफ्ट’ शब्द हटवला, पण शरीफ दणक्यात ‘एक्स्पोज’ झाले
आज सकाळी भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३० च्या सुमारास अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले. मात्र, अवघ्या काही तासांनंतरच, इराणच्या एका तेल शुद्धीकरण कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची बातमी आली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, हा शुद्धीकरण कारखाना पर्शियन आखातातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या लावान बेटावर आहे. विशेष म्हणजे, लावान बेट हे इराणच्या प्रमुख कच्च्या तेलाच्या निर्यात केंद्रांपैकी एक आहे.