‘लिंगपिसाट’ला सुट्टी नाहीच! पोलिस कोठडीतून सुटताच न्यायालयीन कोठडीत अडकला, सुनावणीत काय घडलं?

पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीतून सुटताच भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलीयं.

Ashok Kharat

Ashok Kharat

Ashok Kharat : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी भोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलीयं. पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अशोक खरातला (Ashok Kharat) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती व्ही. ई. इच्छपुरानी यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी पार पडली असून खरातवरील गुन्हे पाहता त्याला सुट्टी मिळणारच नसल्याची चर्चा रंगू लागलीयं.

सारा अली खानने डबिंग स्टुडिओमधील झलक शेअर केली; मुदस्सर अज़ीजसोबतच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

भोंदू अशोक खरात प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांकडून आरोपीच्या नावाची विचारपूस झाली असून
आरोपीचे वकील सचिन भाडे कोर्टात यांनी युक्तिवाद केला आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील शैलेंद्र बागडे, तपासी अधिकारी किरण सुर्यवंशी हजर होते. मागील सुनवाणीदरम्यान, अशोक खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली होती. त्यानंतर आज अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं.

सात दिवसांच्या कोठडीत महिला लैंगिक शोषण प्रकरणात महिलेला लग्नाचं अमिष अन् वारंवार बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्याही दिल्या असल्याचे पुरावे एसआयटीमार्फत न्यायालयात सादर करण्यात आले होते. या सुनावीमध्ये पोलिसांनी अशोक खरातची कोठडी मागितली होती, त्यानंतर सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अखेर आता अशोक खरातची एका गुन्ह्यातून पोलिस कोठडी संपताच दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी बजावण्याचं सत्र सुरुच आहे.

महावितरणची आर्थिक पुनर्रचना ते आयटी केडर ; राज्य मंत्रिमंडळाचे पाच धडाकेबाज निर्णय

अशोक खरातवर नेमके गुन्हे किती?
पोलीस महासंचालकांनी अशोक खरात आरोपी असलेल्या गुन्ह्याचा तपास एसआयटी मार्फत करण्याचा आदेश दिल्याने 20 मार्चपासून या व इतर 10 अशा एकूण 11 गुन्ह्यांचा एसआयटी तपास करत आहे. या पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून 2 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे 24 जणांचे पथक आहे,” अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.

साडेचार हजार लिंक डिलिट
अशोक खरात आणि पीडितांचे लिंक व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्यातील एसआयटीची सायबर टीम आणि महाराष्ट्र सायबर क्राइमने 4650 लिंक डिलिट केल्या आहेत. तर सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे 451 अकाउंट कायमचे हटविण्यात आले आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांना दोन गुन्हे दाखल आहेत. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version