अहमदनगरः खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असते. वाहनधारकांना तर अशा रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. जर रस्त्याची कामे सुरु झालीच तर त्यामध्ये देखील अनेकदा ती दर्जाहीन असल्याचे समोर येते. असाच प्रकार जामखेडमध्ये उघडकीस आला आहे. जामखेड ते सौताडा हा राष्ट्रीय महामार्ग जामखेड शहरातून जात असून या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र या कामाचा दर्जा चांगला नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.आता या प्रश्नी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) पत्र धाडले आहे.
काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; प्रियंका गांधी, शशी थरुर यांच्यासह अशोक चव्हाणांना स्थान
आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील जामखेड ते सौताडा या एकूण १३ किमी अंतर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे या कामासाठी पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता व त्यांनतर निधी मंजूर झाला होता.
सनी पाजीने थकवले कोट्यावधींचे कर्ज; बँकेने थेट धाडली घराच्या लिलावाची नोटीस
दरम्यान निधी मंजूर झाला व रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली. मात्र काही प्रमाणात पूर्ण झालेल्या कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब आमदार रोहित पवार यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली आहे. दरम्यान मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात पवार यांनी नागरिकांना होत असलेला त्रास याबाबत लिहिले आहे. तसेच पावसामुळे चिखल साचून तसेच सांडपाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान याबाबत वारंवार कंत्राटदारांना सांगण्यात आले तसेच याप्रश्नी त्यांच्याशी चर्चा देखील केली मात्र ती व्यर्थ गेली. कारण आज स्थितीला देखील ‘जैसे थे’च परिस्थिती आहे. आता दर्जेदार आणि उत्तम पद्धतीचे काम होण्यासाठी आपण संबंधितांना निर्देशित करावे. जेणेकरून हा बहुप्रतीक्षित महत्वाचा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होईल. यासाठी आपण स्वतः या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांना केली आहे.