सनी पाजीने थकवले कोट्यावधींचे कर्ज; बँकेने थेट धाडली घराच्या लिलावाची नोटीस

सनी पाजीने थकवले कोट्यावधींचे कर्ज; बँकेने थेट धाडली घराच्या लिलावाची नोटीस

Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशाच्या आनंदात असतानाच सनी देओलसाठी झटका देणारी बातमी धडकली आहे. सनी देओलच्या घराच्या लिलावाची नोटीसच बँकेने पाठविली आहे. जुहू येथील सनी व्हिला घर लिलावात काढण्यासाठी बँकेने नोटीस पाठविल्याची माहिती आहे.

सनी देओलवर 56 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज आणि व्याजाच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. थकलेली रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या घराचा लिलाव केला जाणार आहे. या संदर्भात बँकेने वृत्तपत्रात जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली आहे. 51.43 कोटी रुपयांच्या बोलीपासून लिलाव सुरू केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Gadar 2: सनी पाजीचा ‘गदर2’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला चित्रपट

या जाहिरातीत कर्जदार म्हणून अजयसिंह देओल उर्फ सनी देओल असे नाव लिहीलेले आहे. जुहू येथील गांधी ग्राम रोडवर त्याचे घर आहे. बँकेने नोटीस दिली असली तरी या नोटिसीवर सनी देओलकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. फक्त सनी देओलच नाही तर त्याच्या सनी साउंड या कंपनीला नोटीस जारी करण्यात आली आहे. यामध्ये विजय धर्मेंद्र गोयल आणि धर्मेंद्र गोयल यांनाही नोटीस पाठविली आहे. सनी देओलकडील कर्जाची मुद्दल आणि व्याजासहीत एकूण थकीत रक्कम 55 कोटी 99 लाख 80 हजार 766 रुपये इतकी आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी शेवटची मुदत 22 सप्टेंबर 2023 अशी आहे.

दरम्यान, बँकेने पाठवलेल्या या नोटीसवर सनी देओलने अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचा गदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. त्याचा चित्रपट लवकरच तीनशे कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. विकेंडमध्ये त्याचा चित्रपट चांगली कमाई करत आहे. चित्रपटातच्या प्रमोशनमध्ये सनी देओल सध्या व्यस्त आहे. यानंतर आता तो या नोटीसीला काय उत्तर देणार, थकीत कर्ज फेडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Box Collection: अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ची निराशाजनक कामगिरी; पहिल्या दिवशी कमावले फक्त…

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube