मोठी बातमी, आयकर विभागाच्या रडारवर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग; 12 ठिकाणी छापे

Rakul Preet Singh : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि चित्रपट निर्माते वासू भगनानी आणि 'पॅनोरामा स्टुडिओज'शी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Rakul Preet Singh

Rakul Preet Singh : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि चित्रपट निर्माते वासू भगनानी आणि ‘पॅनोरामा स्टुडिओज’शी संबंधित ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. माहितीनुसार, बॉलिवूडशी संबंधित अनेक व्यक्ती आणि चित्रपट निर्मिती कंपन्यांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) कारवाई केली आहे.

आयकर विभागाने मुंबईतील चित्रपटसृष्टीशी संबंधित 12 ठिकाणी एकाच वेळी तपासणी मोहीम सुरू केली आहे. या कारवाईच्या कक्षेत अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) , चित्रपट निर्माते वासू भगनानी आणि ‘पॅनोरामा स्टुडिओज’शी संबंधित ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, ही तपासणी चित्रपट प्रकल्पांच्या संदर्भात परदेशात पाठवण्यात आलेल्या कथित निधीशी संबंधित आहे. प्राप्तिकर विभागाचे मुंबईतील पथक या ठिकाणांवरील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे आणि माहितीची छाननी करत आहे. या तपासणी मोहिमेबाबत विभागाकडून अद्याप सविस्तर अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

follow us