ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला अटक, 35 लाखांचे कोकेन जप्त
Rakul Preet Singh : बॉलीवूडची (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्री रकुलप्रीत सिंग (Rakul Preet Singh) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते. मात्र आज ती एका वेगळ्या कारणाने सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत (Aman Preet Singh) याला ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अमनप्रीत सिंग याला तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरोने नरसिंगी पोलिस (सायबराबाद) च्य मदतीने ही कारवाई केली आहे. हैदरशाहकोटमधील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी अमनप्रीत सिंग याला अटक केली आहे. या फ्लॅटमध्ये पोलिसांना 199 ग्रॅम कोकेन (Cocaine) सापडले. ज्याची अंदाजे रक्कम 35 लाख रुपये आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात पाच ड्रग्ज विक्रेते आणि 13 ड्रग्स वापरणाऱ्यांना अटक केली आहे. तर या प्रकरणात अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीतचे नाव ग्राहक म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी ड्रग्ज सेवन करणाऱ्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या 13 जणांच्या यादीत अमनप्रीतचे नाव टाकले आहे. येत्या काही तासात या पाच ड्रग्ज विक्रेते आणि 13 ड्रग्ज वापरणाऱ्यांना पोलीस न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Rajya Sabha Election : भाजपचा राज्यसभेत होणार गेम? संख्याबळ घटले
अमन प्रीत सिंग, अनिकेथ रेड्डी, प्रसाद, मधुसूदन आणि निखिल दमन असे पाचही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
पत्रकार परिषदेत अमनप्रीतबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, अमनप्रीत या आरोपींच्या संपर्कात कधी आला याचा तपास आम्ही सुरु केला असून. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये भारतीय आणि नायजेरियन लोकांचा समावेश आहे.
विशाळगड तोडफोड प्रकरण, संभाजीराजे छत्रपती शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर