सरकार सत्तेच्या धुंदीत, ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांनी पदमुक्त व्हावं; रोहित पवार कडाडले

सरकार सत्तेच्या धुंदीत, ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांनी पदमुक्त व्हावं; रोहित पवार कडाडले

Rohit Pawar : पुण्यात ड्रग्जचं रॅकेट (Drug racket) थांबता थांबत नाही. शनिवारी एफसी रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आता आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली.

4 नव्या चेहऱ्यांना संधी अन् नवीन कर्णधार, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

रोहित पवार यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या बैठकीत राज्यपालांशी काय चर्चा झाली याबाबत सविस्तर माहिती दिली. रोहित पवार म्हणाले की, या बैठकीतील काही विषय मतदारसंघ तर काही विषय महाराष्ट्राच्या हिताचे होते.  राज्यात वारंवार होणारी पेपरफुटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिक्त पदांच्या भरतीत सुरु असलेला गैरव्यवहार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत राज्यपालांशी चर्चा केली, असं ते म्हणाले.

संघर्ष वाढणार? ‘या’ गावात OBC वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, पण लक्ष्मण हाकेंचा विरोध 

पुढं रोहित पवार म्हणाले, पुण्यात हजारो कोटींच ड्रग्ज सापडलं. पुणे विद्यापीठामध्येही ड्रग्स सापडलं होतं. आता पुन्हा एकदा ड्रग्जची नशा करतांना काहीजण आढळून आलेत. हे सरकार सत्तेच्या धुंदीत आहे. ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री चालू आहे, निवडणूकीत गुंडाचा वापर केल्या जातोय, ते पाहता भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांना पदमुक्त करावं. निकाल लागला म्हणून ते पदमुक्त होणार होते. पण, त्यासाठी त्यांना पदमुक्त केलं नसलं तरी आता सामान्य लोकांच्या हितासाठी फडणवीसांनी पदमुक्त व्हावं, अशी टीका रोहित पवारांनी केली.

पुढं बोलतांना रोहित पवार म्हणाले, केंद्र सरकारने जो पेपरफुटी संदर्भात जो कायदा केला तसाच कायदा राज्यात असावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. उत्तराखंडमधील राज्यपालांनी स्वत: पुढाकार घेऊन तो कायदा उत्तराखंडमध्ये केला. त्याचधर्तीवर आता हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा, तशा सूचना त्यांनी सरकारला द्याव्यात, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार पुढं म्हणाले, महायुतीचं हे शेवटचं अधिवेशन आहे. 2024 ला ते काही परत सत्तेत येत नाही. त्यामुळं आता निवडणुकीच्या तोंडावर काम दाखवण्यासाठी, आमदारांना खुश करण्यासाठी आणि कमिशन मिळण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना अतिरिक्त निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज