संघर्ष वाढणार? ‘या’ गावात OBC वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, पण लक्ष्मण हाकेंचा विरोध

संघर्ष वाढणार? ‘या’ गावात OBC वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, पण लक्ष्मण हाकेंचा विरोध

OBC Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) राजकीय वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण करत होते. त्यामुळे सध्या आरक्षणाचा मुद्दा गावपातळीवर पोहोचला आहे.

काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशावरून मराठा समाजाने आरक्षणासाठी सर्व नेत्यांना गावबंदी केली होती तर आता जालना जिल्ह्यातील रायगव्हाण (Raigavan) गावातील नागरिकांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ इतर मागासवर्गीय वगळता सर्वच पुढाऱ्यांना गावबंदी केल्याची माहिती समोर आली आहे.

ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 14 जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी जरांगे यांच्या या मागणीला जोरदार विरोध करत आहे. या मागणी विरोधात जालन्याच्या वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांनी उपोषण केला होता पण सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची ग्वाही दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आहे मात्र आंदोलन सुरु राहणार असे देखील ते म्हणाले होते त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला होता.

तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनानंतर जालना जिल्ह्यातील गायगव्हाण गावात ओबीसी नेते वगळता इतर कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश देणार अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. तसेच या बाबत गावकऱ्यांनी गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर बॅनरही लावले आहे. गावात ओबीसी नेत्या वगळता इतर कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान केला जाईल असा इशारा या बॅनरद्वारे गावकऱ्यांनी दिला आहे.

‘रस्सी जल गई, बल नहीं गया’, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल

सध्या हा फोटो सोशल मीडियावव्हायरल झाला आहे. गावकऱ्यांनी या बॅनरवर लक्ष्मण हाके यांच्यासह दिवंगत गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांचे फोटो लावले आहे मात्र गावकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला स्वतः लक्ष्मण हाके यांनी विरोध केला असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज