4 नव्या चेहऱ्यांना संधी अन् नवीन कर्णधार, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

4 नव्या चेहऱ्यांना संधी अन् नवीन कर्णधार, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

India Tour Of Zimbabwe : आज (24 जून) भारतीय संघ (Team India) T20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 मधील आपला तिसरा सामना ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे तर दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने मोठा निर्णय घेत या दौऱ्यासाठी शुभमन गिलला (Shubman Gill) कर्णधारपदाची संधी दिली. गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध  5 टी 20 सामन्याची मालिका खेळणार आहे. ज्याची सुरुवात 6 जुलैपासून होणार आहे. बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक स्टार खेळाडूंना विश्रांती दिली आहे तर त्यांच्या जागी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली आहे. तर आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारा युवा सलामीवीर अभिषेक शर्माला भारतीय संघात स्थान देण्यात आले तसेच मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि रियान पराग आणि नितीश रेड्डी यांची पहिल्यांदा भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका 6 जुलैपासून सुरु होणार आहे. या मालिकेचा दुसरा सामना 7 जुलै रोजी, तिसरा सामना 10 जुलै रोजी, चौथा सामना 13 जुलै आणि पाचवा सामना 14 जुलै होणार आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान , खलील अहमद , मुकेश कुमार , तुषार देशपांडे.

T20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : 6 जुलै, हरारे स्पोर्ट्स क्लब

दुसरा सामना : 7 जुलै, हरारे स्पोर्ट्स क्लब

तिसरा सामना : 10 जुलै, हरारे स्पोर्ट्स क्लब

चौथा सामना : 13 जुलै, हरारे स्पोर्ट्स क्लब

संघर्ष वाढणार? ‘या’ गावात OBC वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी, पण लक्ष्मण हाकेंचा विरोध

पाचवा सामना : 14 जुलै, हरारे स्पोर्ट्स क्लब

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज