BCCI Annual Award: शुभमन गिलला 2023 चा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

BCCI Annual Award:  शुभमन गिलला 2023 चा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिलला (Shubman Gill) 2023 सालच्या सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पॉली उमरगर पुरस्कार (Polly Umargar Award) जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2154 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने एका वर्षात 7 शतके झळकावली आहेत. यामध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचाही समावेश आहे. याशिवाय त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले होते. त्याचा कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने हा पुरस्कार जाहीर केला आहे.

तसेच माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार (सीके नायडू) जाहीर झाला आहे. या पुरस्कारानंतर रवी शास्त्री यांचा कपिल देव, सुनील गावस्कर, सय्यद किरमाणी आणि केएस श्रीकांत यांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. बीसीसीआयचा हा वार्षिक पुरस्कार सोहळा 23 जानेवारीला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रोहित शेट्टीने चेन्नई एक्सप्रेसबद्दल शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा सांगितला; म्हणाला ‘लुंगी डान्स’ हे गाणे…’

बीसीसीआयने आत्तापर्यंत नारी कॉन्ट्रॅक्टर, गुंडप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ, सलीम दुर्रानी, ​​अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, राजिंदर गोयल, पद्माका शिवलकर, पंकज रॉय आणि अंशुमन गायकवाड यांना हा जीवनगौरव पुरस्कार दिले आहेत. आता या दिग्गज खेळाडूंमध्ये रवी शास्त्री यांचाही समावेश झाला आहे.

हृतिक-दीपिकाच्या ‘फाइटर’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 2.84 कोटींची कमाई

शास्त्री यांनी भारतासाठी 80 कसोटी आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी 15 शतकांसह 6938 धावा केल्या आणि 280 विकेट्सही घेतल्या आहेत. 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे शास्त्री देखील एक भाग होते. त्यांनी भारतासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिकाही बजावली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज