हृतिक-दीपिकाच्या ‘फाइटर’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 2.84 कोटींची कमाई

हृतिक-दीपिकाच्या ‘फाइटर’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 2.84 कोटींची कमाई

Fighter Advance Booking: चित्रपट निर्माते सिद्धार्थ आनंदचा (Siddharth Anand) बहुचर्चित ‘फायटर’ (Fighter Movie) हा चित्रपट अवघ्या तीन दिवसांत प्रदर्शित होणार आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर या चित्रपटाने रिलीजपूर्वीच बंपर कमाई केली आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हवाई दलाच्या पायलटवर आधारित हा चित्रपट आहे, म्हणूनच निर्माते प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित करत आहेत.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, ‘फायटर’ने पहिल्याच दिवशी अॅडव्हान्स बुकिंगद्वारे 2.84 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पहिल्याच दिवशी या अॅक्शन फिल्मची 86,516 तिकिटे विकली गेल्याचे सांगण्यात येत आहे. फायटरने पहिल्याच दिवशी 86,516 अॅडव्हान्स बुकिंग करून 2.84 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2D हिंदी आवृत्तीसाठी 33,624 तिकिटे, 3D आवृत्तीसाठी 46,790 तिकिटे, IMAX 3D अॅक्शनसाठी 4,881 तिकिटे आणि 4DX 3D साठी 1,221 तिकिटे विकली गेली आहेत.

एआयची कमाल! लता दीदींच्या आवाजात केलं गाणं रेकॉर्ड, ‘राम आएंगे’ गीत तुफान व्हायरल

वृत्तानुसार, चित्रपटाचे सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रात 75.02 लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. दिल्लीत 67.39 लाख, तेलंगणात 40.73 लाख आणि कर्नाटकात 43.54 लाख रुपयांची तिकिटे विकली गेली आहेत. ‘फायटर’ची कथा एअर ड्रॅगनभोवती फिरते. ज्याची नियुक्ती हवाई मुख्यालयाने श्रीनगर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांवर कारवाई करण्यासाठी केली आहे. या युनिटमध्ये भारतीय हवाई दलातून निवडलेल्या सर्वोत्तम लढाऊ वैमानिकांचा समावेश आहे, जे शत्रूंना प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक क्षणी तयार असतात.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यामध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज