पाकिस्तानविरुद्ध काटे की टक्कर, भारतीय संघात ‘या’ स्टार खेळाडूची होणार एंट्री

पाकिस्तानविरुद्ध काटे की टक्कर, भारतीय संघात ‘या’ स्टार खेळाडूची होणार एंट्री

IND vs PAK 2024: अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत उद्या न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK 2024) यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याकडे जगातील सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) आपल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडचा (Ireland) आठ गडी राखून पराभव केला आहे तर पाकिस्तानला (Pakistan) पहिल्या सामन्यात अमेरिकेने (USA) धक्का देत सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे.अशा परिस्थितीत या सामन्यात दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन कसे असू शकतात हे जाणून घेऊया.

कुलदीप यादव करणार संघात एंट्री?

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने एक नवीन कॉम्बिनेशनने प्लेइंग इलेव्हन खेळवल्यामुळे फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात स्थान मिळाला नव्हता मात्र कुलदीपचा सध्याचा फॉर्म आणि पाकिस्तानी फलंदाज पाहता भारतीय संघात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तो अक्षर पटेलच्या जागी संघात येऊ शकतो.

विराटवर नवीन जबाबदारी

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीवर पाकिस्तानविरुद्ध नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघाच्या डावाची वेगवान सुरुवात करण्याची नवी जबाबदारी विराट कोहलीवर देण्यात आली आहे. मात्र तो उद्याच्या सामन्यात मोहम्मद आमिर विरुद्ध कोणत्या प्लॅननुसार खेळतो हे पाहावे लागणार आहे.

यशस्वी जैस्वाल परतणार का?

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीने भारतीय डावाची सुरुवात केली होती तर ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आला होता. यामुळे सलामीवीर यशस्वी जैस्वाल पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात संघात खेळणार का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाच्या नव्या कॉम्बिनेशननुसार यशस्वी जयस्वालला पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघात स्थान मिळताना दिसत नाही.

India probable playing XI: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

मीडिया हाऊसेस येणार गोत्यात? ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Pakistan probable playing XI: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद आमिर.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज