IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? कुणाच्या धमकीनं उडाली खळबळ..

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? कुणाच्या धमकीनं उडाली खळबळ..

IND vs PAK : टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या 9 जून रोजी सामना (IND vs PAK) होणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाखो रुपयांना तिकीटांची विक्री होत आहे. खेळाडूंनीही या सामन्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र त्याआधीच हा सामना रद्द होतो की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. याचं कारण म्हणजे आयएसएस या दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली असून न्यूयॉर्क पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. नासा काउंटीचे प्रमुख ब्रूस ब्लॅकमॅन यांनी सांगितले की आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत.

ब्लॅकमॅन पुढे म्हणाले, आम्ही प्रत्येक धमकीला गांभीर्याने घेतो. कोणतीही धमकीला आम्ही कमी लेखत नाही. आयएसआयएस संघटनेने ब्रिटीश चॅट साइटवर क्रिकेट स्टेडियमचा एक फोटो पोस्ट केला. या स्टेडियमवर ड्रोन उडताना दिसत आहेत. ज्यावर भारत पाकिस्तान सामन्याची तारीख 9/06/2024 लिहीलेली होती. या पोस्टचा एक स्क्रिनशॉट एनबीसी न्यूयॉर्क टिव्हीवरील एका वृत्तात प्रसारित करण्यात आला होता.
न्यूयॉर्कच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टला फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यांनी सांगितले की आम्ह परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहेत. सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका नाही असे होचुल यांनी सांगितले. या धमकीनंतर येथील सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहतेही काळजीत पडले आहेत. सामना कदाचित रद्द होतो की काय अशीही शंका आता उपस्थित केली जात आहे.
न्यूयॉर्क येथील स्टेडियमची क्षमता तीस हजारांची आहे. एक जूनपासून टी 20 विश्वकप स्पर्धा सुरू होणार आहेत. यानंतर तीन जूनपासून नियमित सामने सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंड बरोबर होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 9 जूनला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला सहा वेळा धूळ चारली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube