अमेरिकेने इतिहास रचला! सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; मुंबईचा नेत्रावळकर चमकला

अमेरिकेने इतिहास रचला! सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा धुव्वा; मुंबईचा नेत्रावळकर चमकला

PAK vs USA : टी 20 विश्वचषक स्पर्धेत यजमान अमेरिका संघाने मोठा उलटफेर (T20 World Cup 2024) करून दाखवला. बलाढ्य पाकिस्तान (Pak vs Usa) संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून इतिहास रचला. पहिल्याच सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाकडून झालेला हा पराभव पाकिस्तानसाठी अत्यंत नामुष्कीचा ठरला. या पराभवानंतर क्रिकेट विश्वात पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली आहे. या पराभवानंतर संघाची स्पर्धेतील वाटचाल (USA vs PAK) अधिक कठीण झाली आहे. यानंतर रविवारी पाकिस्तानला बलाढ्य भारतीय संघाला झुंजावे लागणार आहे. भारताविरूद्धच्या सामन्यातील रेकॉर्ड पाहिले तर पाकिस्तानला पराभवच जास्त पहावे लागले आहेत.

डॅलस क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून अमेरिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे पाकिस्तानला 159 धावांवर रोखणे शक्य झाले. पाकिस्तानी संघाची सुरुवात मात्र अतिशय खराब राहिली. संघाच्या 26 धावा झालेल्या असतानाच तीन विकेट्स पडल्या होत्या. यानंतर कर्णधार बाबर आझमने डाव सावरला. त्याने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर शादाब खानने 40 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारामुळे पाकिस्तानला 159 धावांपर्यंत मजल मारता आली.

Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?

यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिकन संघाने सावध फलंदाजी केली. कर्णधार मोनांक पटेलने अर्धशतक केले. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांचा गरज होती. यावेळी हारिस राउफ गोलंदाजी करत होता. यानंतर नितीश कुमारने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना बरोबरीत आणला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये अमेरिकन फलंदाजांनी जोरदार आक्रमण केले. एकाच ओव्हरमध्ये 19 धावा केल्या. जिंकण्यासाठी पाकिस्तानला 20 धावा करायच्या होत्या. मात्र त्यांना फक्त 13 धावा करता आल्या. अशा प्रकारे विश्वचषकातील पहिलाच सामना पाकिस्तानने गमावला.

अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये अचूक गोलंदाज केली. त्याने दोन विकेट घेत पाकिस्तानच्या विजयाच्या वाटा बंद केल्या. तसेच या ओव्हरमध्य प्रभावी मारा करत पाकिस्तानचा फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. या पराभवानंतर संघाची स्पर्धेतील वाटचाल (USA vs PAK) अधिक कठीण झाली आहे. यानंतर रविवारी पाकिस्तानला बलाढ्य भारतीय संघाला झुंजावे लागणार आहे. भारताविरूद्धच्या सामन्यातील रेकॉर्ड पाहिले तर पाकिस्तानला पराभवच जास्त पहावे लागले आहेत.

Team India Australia Tour : टीम इंडिया-ऑस्ट्रेलियाच्या कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube