Download App

पाणी आणण्यात तुमचे योगदान काय, तुम्ही 8 महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल

चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? - बाळासाहेब थोरात

  • Written By: Last Updated:

Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe : दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण आणि कालवे पूर्ण केले. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या (Bhausaheb Thorat) संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी तयार केली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय? असा सवाल कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe ) यांना केलाय.

Video : रशियात तब्बल 600 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक! चिलीसह अनेक बेटांवर त्सुनामीचा अलर्ट 

प्रवरा कारखान्याने अंग काढून घेतलं..
बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरता 1977 मध्ये संगमनेर आणि प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये भाऊसाहेब थोरातांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली. 1996 मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले. तर 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा आणि सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केलीय, असं थोरात म्हणाले.

चारीसाठी आपण निधी दिला…
आपण जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतु पुल, काँक्रीट कामे आणि लांबी करता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन पिंपळे नान्नज दुमाला, पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तीगाव, वरझडी या गावांकरता मिळावे याकरता पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्यापर्यंत पाणी गेले, असं थोरात यांनी म्हटलं.

विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील 4 दिवसांत राज्यभरात पावसाची हजेरी 

विखेंचं योगदान काय?
मंत्री विखे पाटील यांच्यावर टीका करताना थोरात म्हणाले, तुम्हीही अनेक वर्ष मंत्री आहात. यापूर्वी या चारीच्या कामासाठी तुम्ही कोणते योगदान दिले. या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का ? असा सवाल थोरातांनी केला. तर नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारी सुद्धा माहित नव्हती, असं थोरात म्हणाले.

यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली. मे आणि जून मध्ये चांगला पाऊस झाल्याने लवकर भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापुर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. याचा सर्वाधिक आपल्याला आनंद आहे. ही चारी मागील आठ महिन्यात झाली का ? या चारीच्या कामात आपले योगदान काय ? असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.

 

 

follow us