नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आपल्या भाषणात मिश्किल टोला लागवला. त्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये हशा पिकला.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मुख्यमंत्री काम करीत आहेत पण आमची संधी घालवली. असा मिश्किल टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समोरासमोर लावला. पुढं थोरात म्हणाले, पण गडी मेहनती आहे हे विसरता येत नाही. तुम्हाला जी संधी मिळाली आहे ती तुम्ही काम करण्यात घालवता आहात हे आम्ही बघतो आहेत. हे सर्व काही आहे ते सर्वसामान्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी आहे. लोकशाहीने ही संधी प्रत्येक पक्षाला दिली आहे. तशी संधी आता तुम्हाला दिली आहे, असे थोरात म्हणाले.
धनंजय मुंडेंना भावला वंदे भारतचा प्रवास, केले कौतुक; नेटकरी म्हणाले, धनुभाऊ..
बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडवले जाणार नाही. जे काही अवकाळी पावसात नुकसान झाले याची लवकरात लवकर नुकसान भरपाई करून मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या लोकापर्णन कार्यक्रमात राज्यातील अनेक नेते ऐकवटले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावर सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे तसेच राज्यातील खासदार, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.