धनंजय मुंडेंना भावला वंदे भारतचा प्रवास, केले कौतुक; नेटकरी म्हणाले, धनुभाऊ..

धनंजय मुंडेंना भावला वंदे भारतचा प्रवास, केले कौतुक; नेटकरी म्हणाले, धनुभाऊ..

Vande Bharat Express : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नुकताच मोदी सरकारने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) या रेल्वेने प्रवास केला. या ट्रेनने आ. मुंडे यांनी पहिल्यांदाच मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास केला. त्यांना हा अनुभव कसा वाटला हे त्यांन ट्विट करत सांगितले. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या या खास ट्रेनचे कौतुकही केले. सरकारने देशातील काही निवडक रेल्वे मार्गांवर ही रेल्वे सेवा सुरू केली आहे. यामध्ये राज्यातील मुंबई पुणे या मार्गाचा समावेश आहे. मुंडे यांनी आज याच मार्गे प्रवास केला.

वाचा : वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू… 

मुंडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले, की आज पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसने मुंबई ते पुणे दरम्यान प्रवासाचा योग आला. वंदे भारतचा प्रवास व ट्रेन दोन्हीही उत्तम आणि प्रभावी वाटले, अशा शब्दांत त्यांनी वंदे भारत ट्रेनमधून केलेल्या प्रवासाचे वर्णन केले आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Vande Bharat Train : पंतप्रधान मोदींनी सांगितली वंदे भारत एक्सप्रेसची खासियत..

राजकारणा पलीकडे जाऊन केलेल्या चांगल्या कामाचे केलेल्या कौतुकाचे काही नेटकऱ्यांनी स्वागत केले तर काही जणांनी त्यांना थेट धनुभाऊ प्रवेश करताय का.. असे म्हणत चिमटा काढला.

दरम्यान, आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसचे ट्रेनचे लोकार्पण केले होते. या ट्रेनमुळे पुणे व मुंबईमधील अंतर वेगाने पूर्ण केले जाणार आहे. वंदे भारतचे तिकीट दर मात्र अन्य ट्रेनच्या तुलनेत जास्त असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube