Ahmednagar गंगामाई साखर कारखान्याला मोठी आग

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात […]

Untitled Design (3)

आग

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली आहे. ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आगीपासून बचाव होण्यासाठी परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात येत आहे.

इथेनॉलनमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात येत आहे.

Jagadish Mulik : रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी 

आगीची तीव्रता मोठी असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. या आगीत तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी कारखाना प्रशासन मोठी कसरत करत असून सर्वांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले आहे. कारखान्याकडे कोणीही जावू नये, याबाबत खबरदारी घेतली जात आहे.

Exit mobile version