Jagadish Mulik : रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (91)

कसबा ( Kasaba )  विधानसभा मतदारसंघाच्या अनेक बूथ वरती बोगस मतदान करण्याचे नियोजन महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून झालेले आहे. याची माहिती आमच्याकडे आलेली आहे. मतदार याद्यांमध्ये बोगस नाव दिसून आलेली आहेत . आम्ही बोगस मतदान होऊ देणार नाही. याबाबत पोलिसांनी दक्ष राहिले पाहिजे, बंदोबस्त बुथ मध्ये शाळांमध्ये लावला गेला पाहिजे यासाठी आम्ही पोलिस आयुक्तांना भेटलो, अशी माहिती पुणे शहर भाजपचे ( BJP )  अध्यक्ष जगदीश मुळीक ( Jagadish Mulik )  यांनी दिली आहे.

आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना तक्रार देण्यासाठी आलो आहोत, की पाच वाजल्यानंतर कुठल्याही उमेदवाराला किंवा पक्षाला प्रचार करता येत नाही. आम्ही मतदान यादीचे पुरावे दिलेले आहेत. उपोषणाचे नाटक केले आहे समोर पराभव दिसत असताना सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न या उमेदवाराने केला आहे. ही एक नौटंकी आहे हा पब्लिक स्टंट आहे. एक प्रकारे केलेला हा प्रचार आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने ॲक्शन घेतली पाहिजे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाले आहे आणि या उमेदवाराचे उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

(अजितदादा, तुमची पुण्यात येऊन वाजवीन; चिडलेल्या राणेंचा सज्जड इशारा)

त्यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना भेटण्यास आलेलो आहे. आणि त्यांना सांगणार आहोत,  महाविकास आघाडीच्या या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला आहे. पाच वाजल्यानंतरही उपोषणाचे नाटक करून भाजपावर खोटे आरोप केलेले आहेत पत्रक वाटलेली आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे.  त्यामुळे या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यावा असे आयोगाला सांगणार आहोत, असे मुळीक यांनी सांगितले.

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवर रवींद्र धंगेकर यांनी मतदानापूर्वी भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी आज उपोषण देखील केले. यावरुन भाजपने ही तक्रार केली आहे.

Tags

follow us