Download App

Nitesh Rane : …तर चून-चून के मारेंगे; नितेश राणेंची नगरमध्ये खुलेआम धमकी

आमचे अब्बा पाकिस्तानात नाहीतर हिंदुस्तानात बोलले आहेत, त्यामुळे कोणीही मस्ती केली तर मशिदीत घुसून चून-चून के मारेंगे, या शब्दांत आमदार नितेश राणेंनी खुलेआम धमकावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

Nitesh Rane : आमचे अब्बा पाकिस्तानात नाहीतर हिंदुस्तानात बोलले आहेत, त्यामुळे कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खुलेआमपणे धमकावलंय. महंत रामगिरी महाराजांच्या (Mahant Ramgiri Mahraj) समर्थनार्थ आज अहमदनगरमध्ये सकल हिंदु समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. अहमदनगरमध्ये आज रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.

National Nutrition Week | राष्ट्रीय पोषण सप्ताहाचं महत्व काय? जाणून घ्या खास थीम अन् फायदेही..

नितेश राणे म्हणाले, छत्रपती शिवरायांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तर शुक्रवारी कोणी वर येणार नाही, आमचे अब्बा तुमच्या अब्बांच्या पाकिस्तानात नाही तर हिंदुस्तानात बोलले आहेत. त्यामुळे एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखं मारु, ज्या रॅलीत नितेश राणे चालतो, तिकडं कोणी येत नाही, हा हिंदुंचा देश येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही, कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, या शब्दांत नितेश राणे यांनी धमकावलंय.

माझा राजीनामा मागितला नाहीतर काहींना अपचन होतं…; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला

रामगिरी महाराज अभी झांकी है, पुरा हिंदुस्थान बाकी हैं…
महंत रामगिरी महाराज झाकी है, पुरा हिंदुस्थान बाकी है, महाराज वन्स मोर, तुम्ही पुन्हा बोलून दाखवा, मी काही प्रवचन, भाषणवाला नाही, मी पूर्ण कार्यक्रम करून येतो. 63 एन्काऊंटरचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या मी मुलगा आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटवड हिंदू आहेत, देवेंद्र फडणवीस तर १००% हिंदुत्व असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.


.
पठाणलाही तोच अन् आपटेलाही तोच नियम लावा..
हिंदु-मुस्लिम कोण करत आहे, जो नियम तुम्ही पठाणला लावलायं तोच नियम शिल्पकार जयदीप आपटे याला लावा, शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेचं समर्थन करणार नाही, आपटेला माझ्या समोर येऊ द्या त्याला आपटल्याशिवाय राणे नाव सांगणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

follow us