‘मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा कोर्टात जा’; खा. विखेंनी रोहित पवारांना फटकारले

Sujay Vikhe replies Rohit Pawar : तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर […]

पराभवानंतर विखे भाजपच्या विरोधात? ईव्हीएमवरील शंकेनंतर रोहित पवारांचा दावा

Rohit Pawar

Sujay Vikhe replies Rohit Pawar : तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर दिले.

नगर शहरातील बंधन लॉन्स येथे महायुतीचा मेळावा आज होणार आहे. या मेळाव्याआधी विखे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील विरोधी आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते. या महामेळाव्याची माहिती दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी दिली. तसेच या मेळाव्याला महायुतीचे लोकप्रतिनिधी, पदधिकारी उपस्थित राहणार आहे याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Radhakrishn Vikhe : जनतेच्या पैशांच्या लूटीचा हिशेब द्या म्हणत विखेंनी स्वीकारलं रोहित पवारांचं आव्हान

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वक्तव्याचा समाचार खासदार विखे यांनी घेतला. आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरतीवर केलेल्या टीकेवर देखील प्रत्युत्तर दिले. विखे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षामधील एकएका माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्याच्या पक्षाच्या वैचारिकतेवर व त्यांच्या लोकप्रतिनिधींचे मानसिक संतुलन बिघडल्याचा परिणाम दिसून येतो.

काही दिवसांनी लोक त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाहीत. गेल्या तीन वर्षात काय कामं केली याचा लेखाजोखा त्यांनी द्यावा दीड वर्षात आम्ही काय कामे केली याचा लेखाजोखा मांडण्यास तयार आहोत असे आव्हान भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

Rohit Pawar : लोड वाढलाय तर फक्त गृहमंत्रिपद सांभाळा अन्यथा राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

गेले तीन वर्ष राज्यात सत्ता असताना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा. यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास असेल तर तुमची बाजू न्यायालयात मांडा न्यायालय तुम्हाला योग्य तो निकाल देईल असे यावेळी खासदार विखे म्हणाले.

 

Exit mobile version