Ahilyanagar News : शिक्षकांनी कोडं विचारलं, आईने सोडवलं…भर आंदोलनात शिक्षिकेच्या अंगात देवीचं वारं संचारलं?

अहिल्यानगरमध्ये शासकीय शाळांमधील शिक्षकांना दिलेल्या अशैक्षणिक कामाविरोधात शिक्षकांचा जनआक्रोश मोर्चा धडकला आहे.

Ahilyanagar Jilha Parishad Teachers Protest

Ahilyanagar Jilha Parishad Teachers Protest

Ahilyanagar News : आपण अनेकदा उपोषण, रास्ता रोको आंदोलने पाहिली असतील परंतू भर आंदोलनामध्येच कोणाच्या तरी अंगात येतं आणि संबंधित महिलेला कोडं विचारुन, त्याचे उत्तरे मागवल्याचं पहिलंच आंदोलन समोर आलंय. अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेवर विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा जनआक्रोश मोर्चा धडकलायं. या आंदोलनादरम्यान एका शिक्षिकेच्या (Teacher Protest) अंगात देवी संचारुन इतर शिक्षकांनी अंगात आलेल्या शिक्षिकेला कोडं विचारुन उत्तरे विचारली आहेत. यावेळी अंगात आलेल्या शिक्षिकेने दिलेल्या उत्तराने आंदोलकर्त्या शिक्षकांमध्ये एकच हसू पिकले होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतरत्र अशैक्षणिक कामे लादल्याने जिल्हाभरातील शिक्षकांनी जिल्हा परिषद आवारात जनआक्रोश मोर्चा काढला. शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या ओझ्याविरोधात जिल्हा परिषदेवर जनता मोर्चा धडकलायं. यावेळी ‘शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्याट या घोषणेने परिसर दणाणला होता. शिक्षकांना बीएलओ, एसआयर, जनगणना माहिती संकलनाचे काम दिल्यामुळे शिकवण्यासाठी वेळ मिळत नसल्याचा दावा शिक्षकांकडून करण्यात आला आहे. तसेच शनिवार वार ठरलेला असतानाही आजच्या आज माहिती देण्याचे वरिष्ठांकडून आदेश देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन कोलमडलं, असल्याचाही दावा शिक्षकांनी केला आहे.

तसेच शासनाने माहितीचा वार शनिवार ठरवलं असतानाही स्थानिक स्तरावरुन दरररोज माहितीसाठी दबाव येत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी परिक्षा केंद्रापर्यंत विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित असून मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करुन तीस किलोमीटरच्या अंतरावर राहण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आलीयं.

हा मोर्चा शिक्षकांसाठी नाही तर विद्यार्थ्यासाठी असल्याचं सांगितल जात असून शिक्षकांना शाळेवर जाण्यासाठीच सरकारने वेळ ठेवला नाही. दर आठवड्याला 200 ते 300 मेसेज शिक्षकांना येत असल्याने शिकवायला वेळच मिळत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षकांवरच मोर्चा काढण्याची वेळ येते ही दुर्देवाची गोष्ट, असल्याचा संताप शिक्षकांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मंत्र्यांशी संवाद साधून तोडगा काढणार – आमदार सत्यजित तांबे
राज्यात ही अशीच परिस्थिती तयार झाली असून जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांवर कामाचा ताण आला आहे. राज्यातील शिक्षण विभागातील शिक्षकांना जनगणना, बीएलओ, निवडणूकीचं काम, भटक्या जनावरांच्या सर्व्हेचे काम शिक्षकांना देण्यात आले आहेत. जर शिक्षकांना वर्गात शिकवण्याऐवजी असे कामे दिले तर वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा थेट सवाल आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. तसेच आमच्यासह शिक्षण विभाग पूर्णपणे शिक्षकांच्या पाठिशी उभे असून मंत्र्यांशी संवाद साधून तोडगा काढणार असल्याचं आश्वासन आमदार तांबे यांनी यावेळी दिलंय.

Exit mobile version