Download App

नगर शहर सहकारी बॅंक फसवणूक प्रकरण : सीए विजय मर्दाला पोलीस कोठडी

  • Written By: Last Updated:

Nagar Shahar Co-operative Bank : नगर शहर सहकारी बॅंकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी सायकांळी दापोली येथून पळून जाण्याच्या बेतात असतांना ही अटक करण्यात आली. विजय मर्दा असं अटक केलेल्या सीएचे नाव आहे. दरम्यान, विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि. 18) पोलिस कोठडी सुनावली.

तिकीट मिळाल्यास खासदारकीलाही गुलाल उधळणार! धंगेकरांचा शड्डू 

नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली शहर सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी कर्जदार डॉ. रोहिणी सिनारे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे कर्ज फसवणूक प्रकरणात प्रसिद्ध सीए विजय मर्दा यांना आर्थिग गुन्हे शाखेने अटक केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर कर्ज वाटप केल्याप्रकरणी डॉ. रोहिणी भास्कर सिनारे (राहुरी), डॉ. उज्वला रवींद्र कवाडे (श्रीरामपूर) आणि डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे (शहर) यांनी सप्टेंबर 2018 मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक डॉ. नीलेश शेळके यांच्यासह 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिनारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीए विजय मर्दा यांना काल नगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथून अटक केली. मर्दा यांच्या अटकेनंतर शहरातील बँकिंग क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे

ज्ञानवापी मशीद आणि शाही ईदगाह प्रकरण किती वर्ष जुनं? वादाची संपूर्ण कहाणी… 

विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने सोमवारपर्यंत (दि. 18) पोलिस कोठडी सुनावली. सरकारच्या वतीने आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गुन्ह्याचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडले. यानंतर न्यायालयाने मर्दा यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

नेमकं प्रकऱणं काय?
फिर्यादी डॉ. रोहिणी सिनारे यांच्या नावावर घेतलेले कर्ज हे बनावट खात्यात वर्ग केले गेले. ही रक्कम डॉ. नीलेश शेळके यांनी वापरली. हे कर्ज अन्य खात्यात वर्ग केल्याचं सीए विजय मर्दा यांना माहिती होतं. सीए म्हणून या गैरप्रकाराविषयी सर्व माहिती असूनही ही गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली नाही. उलट, फसवणूक करण्यास मदत केली. ही रक्कम रोखीने काढण्यात आली आहे. यावेळी सीए विजय मर्दा आणि डॉ. शेळके यांनी मालमत्ता खरेदी केली. या मालमत्ता खरेदीसाठी ही रोख रक्कम वापरण्यात आल्याचा संशय आहे.

Tags

follow us