ज्ञानवापी मशीद आणि शाही ईदगाह प्रकरण किती वर्ष जुनं? वादाची संपूर्ण कहाणी…
Shahi Idgah Mosque Case : बनारसच्या ज्ञानवापीच्या धर्तीवर मथुरेतील शाही ईदगाह मशीद (Shahi Idgah Mosque Case) परिसराचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी (Shri krishna Janmbhoomi) आणि शाही ईदगाह मशीद वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शाही ईदगाह मशिदीचे व्हिडीओग्राफी व फोटोग्राफीच्या माध्यमातून तीन वकीलांच्या समितीकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत सर्वेक्षणाची रूपरेषा निश्चित होण्याची शक्यता आहे. बनारस आणि मथुरा मशिदींमधील वाद फार जुना आहे. हा वाद नेमका काय? थोडक्यात जाणून घेऊयात…
Winter Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन नाही तर फोटोसेशन गाजल; पाहा फोटो
ज्ञानवापी मशिदीचा वाद :
1669 मध्ये मुघल शासक औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडून मशीद बांधली होती, असा हिंदू पक्षाचा दावा आहे. तर काही लोक म्हणतात की मशीद आणि मंदिर अकबराने 1585 च्या सुमारास दीन-ए-इलाही अंतर्गत बांधले होते. औरंगजेब दीन-ए-इलाहीच्या विरोधात होता असे इतिहासकारांचे मत आहे. त्यामुळे त्यांनी मंदिर पाडण्याचा आदेश दिला. मशिदीचा पहिला उल्लेख १८८३-८४ मध्ये आढळतो. अकबराच्या काळात तोडरमल यांनी काशी विश्वनाथ मंदिर बांधले होते, असे बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे.
खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद राय हत्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती
सुमारे 100 वर्षांनंतर मंदिर पाडण्यात आले. इंदूरची राणी देवी अहिल्याबाई यांनी १७३५ मध्ये मंदिर बांधले, जे आजही अस्तित्वात आहे. ज्ञानवापी मशीद काढून पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी हिंदू बाजूची मागणी आहे. तर मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीच्या खाली असलेली हिंदू बाजू श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला जात आहे.
Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेत घोटाळा; लंकेकडून थेट कारवाईची मागणी
शाही ईदगाह मशीदीचा वाद :
हा संपूर्ण वाद 13.37 एकर जमिनीच्या मालकी हक्काचा असून श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि शाही इदगाह मशिदीचा वाद सुमारे 350 वर्षांपूर्वी सुरू झाला होता. शाही ईदगाह मशीद देखील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर परिसराला लागून आहे. हिंदू बाजूचे म्हणणे आहे की, औरंगजेबाच्या आदेशानुसार मथुरेतील केशवदेव मंदिर 1670 मध्ये पाडण्यात आले आणि शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली. 13.37 एकर जागेपैकी 11 एकरवर श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर बांधण्यात आले आहे.
शाही ईदगाह मशिदीच्या ताब्यात २.३७ एकर जागा आहे. हिंदू पक्ष संपूर्ण जमिनीवर मालकी हक्क सांगतो. बनारसच्या ज्ञानवापीच्या धर्तीवर आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील शाही ईदगाह मशीद परिसराचे सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे.