खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद राय हत्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती

  • Written By: Published:
खासदार अफजल अन्सारींना SC चा दिलासा, कृष्णानंद राय हत्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती

Afzal Ansari : भाजप आमदार कृष्णानंद राय (Krishnanand Rai) यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर कायद्यांतर्गत 4 वर्षांची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे लोकसभा खासदार अफजल अन्सारी (Afzal Ansari) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्यांना आता लोकसभेचे सदस्यत्व परत मिळणार आहे. मात्र, त्यांना सभागृहात मतदानाचा अधिकार असणार नाही.

मोदी शाहांविरोधात घोषणा, सभागृहात गोंधळ; डेरेक ओ ब्रायन यांच्यासह काँग्रेसचे पाच खासदार निलंबित 

29 एप्रिल रोजी दोषी ठरल्यानंतर अफजल अन्सारी यांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. आणि त्यानंतर 1 मे रोजी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. दरम्यान, आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी अफजल अन्सारीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता याच्या बाजूने नव्हते. त्यामुळे अफझल अन्सारीला २-१ अशा बहुमताने दिलासा मिळाला.

दाऊदसारखाच अमोल शिंदेही ‘दहशतवादी’ ठरणार! धडकी भरवणारा UAPA कायदा काय आहे? 

न्यायालयाने त्यांच्यापुढे काही अटी घातल्या आहेत. संसद सदस्यत्व बहाल केल्यानंतर अफजल अन्सारी लोकसभेच्या चालू अधिवेशनातही सहभागी होऊ शकणार आहेत. मात्र, अन्सारी लोकसभेत मतदान करू शकणार नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा भत्ताही मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला 30 जून 2024 पर्यंत अफझल अन्सारींचे अपील निकाली काढण्यास सांगितले. गाझीपूर लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

नोव्हेंबर 2005 मध्ये गाझीपूरच्या मुहम्मदाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील बसनिया चट्टी येथे तत्कालीन भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अफजल अन्सारी, त्यांचा भाऊ डॉन मुख्तार अन्सारी आणि मेहुणा एजाजुल हक यांच्याविरुद्ध 2007 मध्ये गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एजाजुल हक यांचे निधन झाले. त्यानंतर कोर्टाने मुख्तार अन्सारीला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्याचवेळी खासदार अफजल अन्सारी यांना 4 वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने अन्सारी यांना दिलासा दिला. अन्सारी यांच्या शिक्षेला स्थिगिती दिल्यानं पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube