Mukhatar Ansari : 16 वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Mukhatar Ansari : 16 वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Mukhtar Ansari Jail : मुख्तार अन्सारीशी संबंधित गँगस्टर अॅक्ट प्रकरणात (Gangster Act cases)उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझीपूरच्या (Ghazipur)एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Courts)आज शिक्षा जाहीर केली. न्यायालयाने माजी आमदार मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. 16 वर्षांपूर्वी काय प्रकरण होते? त्यासाठी मुख्तार अन्सारीला शिक्षा सुनावण्यात आली आहे, ते जाणून घेऊयात. या प्रकरणात त्यांचा भाऊ आणि बसपचे विद्यमान खासदार अफजल अन्सारी (MP Afzal Ansari) हे देखील आरोपी आहेत, त्यावर अद्याप निर्णय येणे बाकी आहे.

विखेंना आस्मान दाखवल्यावर आमदार लंके म्हणाले, आम्ही त्यांना विरोधकच समजत नाही

29 नोव्हेंबर 2005 रोजी पूर्वांचलमध्ये एका मोठ्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलं होतं. ही हत्या गाझीपूरमधील मोहम्मदाबादमधील भाजप आमदार कृष्णानंद राय यांची झाली होती. मोहम्मदाबादच्या बसनिया चट्टी येथे आमदार कृष्णानंद राय यांच्यासह 7 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्याकांडात AK-47 चाही वापर करण्यात आला होता.

दोन वर्षांनंतर 2007 मध्ये या प्रकरणाच्या आधारे मुख्तार अन्सारी, त्याचा भाऊ अफजल अन्सारी आणि त्याचा मेहुणा एजाझुल हक यांच्याविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एजाजुल हक यांचे निधन झाले आहे. यासोबतच विश्व हिंदू परिषदेचे खजिनदार आणि कोळसा व्यापारी नंदकिशोर रुंगटा अपहरण प्रकरणाचीही त्यात भर पडली.

2012 साली गँगस्टर ऍक्ट प्रकरणी खटला सुरू झाला होता. गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी प्रथमदर्शनी आरोप निश्चित करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी 1 एप्रिल 2023 रोजी पूर्ण झाली. यापूर्वी 15 एप्रिल रोजी शिक्षा सुनावण्यात येणार होती, मात्र पीठासीन अधिकारी रजेवर असल्याने निकाल येऊ शकला नाही. यानंतर 29 एप्रिल रोजी निकालाची तारीख निश्चित करण्यात आली.

शिक्षा सुनावण्यापूर्वी कृष्णानंद राय यांच्या विधवा आणि माजी आमदार अलका राय म्हणाल्या की, राज्यातील माफिया राजवट संपली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे अलका राय म्हणाल्या. गुंड आणि माफियांची राजवट संपली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube