विखेंना आस्मान दाखवल्यावर आमदार लंके म्हणाले, आम्ही त्यांना विरोधकच समजत नाही
Nilesh Lanke On Sujay vikhe : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (Parner Taluka Agricultural Produce Market Committee)निवडणुकीत महाविकास आघाडीने विखे गट व भाजपचा पराभव करत सत्ता राखली आहे. या निवडणुकीनंतर आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke)यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली आहे.
कर्जतमध्ये ट्वीस्ट ! Rohit Pawar-Ram Shinde गटाला समान जागा ! सभापती होणार कसा ?
आमदार लंके म्हणाले की, आपण या मतदारसंघामध्ये गेल्या साडेतीन चार वर्षांमध्ये जे काम केलं त्याचं समाधान वाटतं. आणि त्या कामाची पावती या मतदार बंधु-भगिनींनी दिली आहे. या विजयाचं श्रेय माझ्या सर्वसामान्य मतदारांना जात आहे.
या ठिकाणी कोण काय पाहात असेल, त्याच्या खोलात मी काही जात नाही. पण आमच्या मतदार संघात त्यांना स्पर्धकच समजत नाही, अशी घणाघाती टीका पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश लंके यांनी खासदार सुजय विखे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली आहे.
आमचे ते स्पर्धकच नाही, तुम्ही पाहिले असेल की, मी माझ्या सभांमध्ये सांगितलं होतं की, कमीत कमी पाचशे. आमचे काही उमेदवार पाचशेच्या फरकाने निवडून आले आहेत. आमचे सर्वात कमीत कमी फरकाचा उमेदवार 200 ते 500 च्या फरकाने निवडून आलं आहे.
हे काही चालत नाही. हा माझा मतदारसंघ स्वाभिमानी आहे. त्यामध्ये लाट फिट काही चालत नाही. आम्ही रोज लोकांमध्ये आहे, 24 तास लोकांची सेवा करतो. बाकीच्यांसारखी पोपटपंची भाषणं करत नाही.
मार्केट कमिटी मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्याच ताब्यात होती. त्या ठिकाणी प्रशांत गायकवाड सभापती होते. त्याचाही या निवडणुकीमध्ये फायदा झालेला आहे. त्यामुळे आम्ही कोणाला स्पर्धक समजत नाही, असा टोला आमदार नीलेश लंके यांनी लगावला आहे.