Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी साईबाबा व महापुरुषांविषची केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई भक्तांकडून देखील भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. भिडेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी साई संस्थानवर मोठा दबाब होता. अखेर साईबाबा संस्थानने या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनीही भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन शिर्डी पोलिसांना दिले आहे. अमरावती येथील जाहीर सभेत साईबाबांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते.
Hariyana Violence : हिंसाचाराचं कारण बनलेला मोनू मानेसर आहे तरी कोण?
या संदर्भातील शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी भिडे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना भिडे यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
Hariyana Violence : आता हरियाणा पेटलं! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ, जीव वाचवण्यासाठी लोकं मंदिरात…
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने साईसंस्थानचे डेप्युटी सीईओ राहुल जाधव यांची भेट घेऊन संस्थानने या प्रकरणी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. संस्थानचे संरक्षण प्रमुख आण्णासाहेब परदेशी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.