Hariyana Violence : आता हरियाणा पेटलं! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ, जीव वाचवण्यासाठी लोकं मंदिरात…

Hariyana Violence : आता हरियाणा पेटलं! जलाभिषेक यात्रेत जाळपोळ, जीव वाचवण्यासाठी लोकं मंदिरात…

Hariyana Violence : मणिपूर राज्य पेटलेली आग विझलेली नसतानाच आता हरियाणामधील गुरुग्रामजवळील नूहमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकल्याचं समोर आलं आहे. नूहमधील मंदिरात जवळापास 2500 पुरुषांसह महिला आणि लहान मुलं जीव मुठीत धरुन बसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अचानक उफाळून आलेल्या हिंसारात गाड्या, चार चाक्यांवर दगडफेक करुन आग लावण्यात येत आहे. हिंसाचाराच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी परिस्थिती नियंतत्रणात आणण्यासाठी टिअरगॅसचा वापर केला आहे. यावेळी पोलिसांकडून हवेतही गोळीबार करण्यात आला आहे.

गुरुग्रामजवळील नूह परिसरात विश्व हिंदु परिषदेद्वारे बृजमंडळ जलाभिषेक यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रा गुरुग्राम-अलवर इथल्या राष्ट्रीय महामार्गावर आली तेव्हा तरुणांच्या टोळीने त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरु केली. त्यानंतर या हिंसाचाराने इतकं रुद्र रुप धारण केलं की, जमावाकडून शासकीय आणि खाजगी वाहनांना टार्गेट करत जाळपोळ सुरु केली.

दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, संशोधनातून माहिती समोर

हिंसाचारानंतर यात्रेतल्या जवळपास 2500 लोकांनी नल्हार महादेव मंदिरात जीव मुठीत धरुन बसले आहेत. मंदिरात बसलेल्या लोकांच्या गाड्या मंदिराच्या बाहेर आहेत. या मंदिर परिसरातून काढण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंसाचार उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सुत्रांकडून घटनास्थळी गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. हिंसाचारामध्ये एकूण 20 लोकं जखमी झाले असून हिंसाचार रोखण्यासाठी या भागात जमावबंदीसह इंटरनेट बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube