Download App

Chhagan Bhujbal : ‘मीच शरद पवारांना सांगून आव्हाडांना मंत्री केलं’; इतिहास सांगत भुजबळांचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर विरोधकांकडूनही टीका होत आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळांवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर भुजबळ यांनी इतिहासाची आठवण देत जोरदार प्रत्युत्तर दिले. शरद पवारांना सांगून मीच जितेंद्र आव्हाडांना मंत्री करायला सांगितलं होतं पण आज मात्र ते सर्व उपकार विसरून माझ्यावर टीका करत आहेत, असे भुजबळ म्हणाले. ओबीसी समाजाच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त भुजबळ संगमनेर शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

भुजबळ पुढे म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी म्हणायला पाहिजे होतं की मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लावू नका. मात्र यावर बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. आता मला बोलका पोपट म्हणत आहेत. त्यावेळी मीच शरद पवार यांनी सांगितलं होतं की वंजारी समाजाचे आहेत त्यांना आपल्या बरोबर घेऊन मंत्री केलं पाहिजे. आता मात्र हे उपकार विसरून माझ्यावरच टीका करता, असा शब्दांत भुजबळांनी आव्हाडांना सुनावलं. भुजबळांच्या  या वक्तव्यानंतर आता जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chhagan Bhujbal : महायुतीत समसमान जागावाटप व्हावं, अजितदादा गटाच्या दाव्यानं भाजपची कोंडी?

 

follow us

वेब स्टोरीज