Download App

छत्रपती शिवराय केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर सज्ज

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Shivarai Kesari State Level Wrestling Tournament in Ahmednagar : शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आहे. यासाठी वाडियापार्क मैदानावर स्टेज उभारणीचे तसेच माती व गादीचे आखाडे तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे.

वाडिया पार्क मैदानावर 150 फूट बाय 50 फूट असे आखाडा स्टेज, 60 फूट बाय 20 फुटाचे व्यासपीठ तसेच 60 फूट बाय 60 फुटाचे व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. स्टेजच्या मागे किल्ल्याच्या प्रतिकृतीचे चार बुरुंज उभारण्यात आले आहेत, तसेच वाडिया पार्क मैदानाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कमानी उभारण्यात आल्या आहेत. सुमारे 10 ते 15 हजार नागरिकांची आसन क्षमता येथे आहे.

स्पर्धा तिन्ही दिवस सकाळी 7 ते 9 व दुपारी चार ते रात्री 10 वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे. छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेनिमित्त उद्या (ता. 21) सकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

MLA Sangram Jagtap : नगरकरांना वेठीस धरु नका, आमदार संग्राम जगतापांनी सुनावलं…

उद्या सायंकाळी चार वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रमुख मान्यवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्याम जाजू व महापौर रोहिणी शेंडगे आदी उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे संयोजक अनिल शिंदे, अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, बाबूशेट टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे व प्रशांत मुथा आदी प्रयत्नशील आहेत.

Tags

follow us