…हार को सामने देखकर जो लढता है वो खिलाडी होता है; बावनकुळेंकडून कुस्तीगीरांना प्रोत्साहन

Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament : भाजप व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती स्पर्धांचे नगरमध्ये झालेल्या आयोजनाचे मला अभिमान वाटत आहे. कोरोनाच्या संकटांनंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्ती महत्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आम्ही राजकारणातही कुस्ती मधील अनेक डावपेचांचा वापर कायम […]

Untitled Design   2023 04 21T214022.552

Untitled Design 2023 04 21T214022.552

Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament : भाजप व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती स्पर्धांचे नगरमध्ये झालेल्या आयोजनाचे मला अभिमान वाटत आहे. कोरोनाच्या संकटांनंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्ती महत्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आम्ही राजकारणातही कुस्ती मधील अनेक डावपेचांचा वापर कायम करत आहोत. असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भाजप सेना युती व जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, भाजपाचे संघटन मंत्री विजय चौधरी, खा.सुजय विखे, आ.बबनराव पाचपुते, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बाळासाहेब मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संयोजन समितीचे वसंत लोढा, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास बेरड आदींसह मोठ्या संख्येने युतीचे पदाधिकारी व कुस्ती शौकीन नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, कुस्ती हा खेळ भारतात पुरातन काळापासून खेळला जात आहे. कोरोनाच्या संकटांनंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्ती महत्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आम्ही राजकारणातही कुस्ती मधील अनेक डावपेचांचा वापर कायम करत आहोत.

महाराष्ट्रात कुस्तीत जो प्रथम आला त्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पोलीस खात्यात घेतले. आता नगर मध्येही मोठी स्पर्धा होत आहे. येथे प्रथमच सोन्याची एवढी मोठी गदा देणार असल्याचा अभिमान मला वाटत आहे. जो कुस्तीगीर ही गदा जिंकेल त्यालाही पोलीस खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली पाहिजे अशी मागणी करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सध्याचे राज्यातील युतीच्या सरकारने क्रीडा क्षेत्राल प्रोत्साहन देण्यासाठी बजेट मध्ये निधी वाढवला आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून ‘छोटीसी मुसिबतसे घाबरा जाये वो अनाडी होता है | हार को सामने देखकर जो लढता है वो खिलाडी होता है |’ असा संदेश त्यांनी सहभागी कुस्तीगीरांना दिला. यावर्षी स्पर्धेच्या विजेत्यास अर्धा किलोची सोन्याची गदा दिली आहे. पुढीलवर्षी विखे पितापुत्र यात भर घालून एक किलोची गदा देतील. राज्याच्या भल्यासाठी ही युती कायम ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले.

वज्रमुठीला आधीच तडे गेल्याने मतभेद उघड होवू लागले, विखेंनी साधला निशाणा

मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी कोणतीही महत्त्वकांक्षा न ठेवता एवढ्या मोठ्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले हे कौतुकास्पद आहे. नगर जिल्ह्याला कुस्तीची मोठी वैभवशाली परंपरा आहे. ती जपली जात आहे. कुस्तीला सरकारने अजून पाठबळ द्यावे. स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांना ही स्पर्धा लाभदायी ठरो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Exit mobile version