वज्रमुठीला आधीच तडे गेल्याने मतभेद उघड होवू लागले, विखेंनी साधला निशाणा

वज्रमुठीला आधीच तडे गेल्याने मतभेद उघड होवू लागले, विखेंनी साधला निशाणा

Radhakrishna Vikhe Patil : राज्यात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा पार पडल्या. पहिली छत्रपती संभाजीनगर मध्ये तर दुसरी नागपूरमध्ये पार पडली. दरम्यान आता याच सभेवरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला आम्ही आमच्या कामातून उतर देवू. तसेच विरोधकांच्या वज्रमूठीला आधीच तडे गेले असल्याने त्यांच्यातील मतभेद आता उघड होवू लागले असल्याचे म्हणतच विखे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

अहमदनगर येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. दरम्यान साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक राज्यामध्ये आले आहे. आज केंद्रीय पथकाचे प्रमुख विजयकुमार तेवतीया यांना विखे पाटील यांनी लम्पी साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राबवल्या गेलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

आता पुन्हा नव्याने काही भागात प्रादुर्भाव आढळून येत असल्याने दुसरी लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. मात्र केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच कृषि विज्ञान केंद्राप्रमाणे देशातील पहिले पशु विज्ञान केंद्र सावळीविहीर येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी दिली.

पुढे बोलताना विखे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. सावळीविहीर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालया बरोबरच पशु विज्ञान केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील पहिले पशुविज्ञान केंद्र हे नगर जिल्ह्य़ात होत असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले…

शेळी मेढी सहकारी महामंडळाचे कार्यालय नगर येथे सुरू होत असून याचे उद्घाटन १ मे रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ढवळपुरी येथे महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube