शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर; नागपूरने मारली बाजी

City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]

DCM Devendra Fadnavis reaction on Kolhapur Riots

DCM Devendra Fadnavis reaction on Kolhapur Riots

City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.

आज मुंबईत नगरविकास दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, राज्यातील शहरांच्या विकासावर सरकारचा भर आहे. केंद्राकडून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो आहे. यामुळे राज्याचा आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. तसेच नगरविकासासाठी यंदा रेकॉर्डब्रेक निधी दिला असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.

मोदी मुंबईत आल्यानं काहींना पोटदुखी…शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी शिंदे यांनी शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर केला. या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक मिळाला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

Exit mobile version