Download App

Balasaheb Thorat: शिर्डीनंतर नगरच्या लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीत पेच ? थोरातांनीच थेट दावा सांगितला

  • Written By: Last Updated:

Balasaheb Thorat : आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच पक्षातील नेत्यांकडून देखील चाचपणी सुरू झाली आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे गुरुवारी नगर दक्षिण दौरा सुरू केला आहे. दक्षिण भागात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेतेही नगर दक्षिण लोकसभा जागा काँग्रेसला मिळावी, याची मागणी करत आहेत. आता बाळासाहेब थोरात यांनीच काँग्रेससाठी जागेवर दावा केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा आहे. तर तेथे काँग्रेसही जागा मागत आहे. त्यामुळे दोन्ही लोकसभेच्या जागा वाटपाचा महाविकास आघाडीसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. हे यातून दिसून येत आहे.

थोरात म्हणाले, दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. ही जागा कॉंग्रेसला मिळावी, यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत मागणी करणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे गुरुवारी नगर दक्षिणच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी चिखली या गावी जात कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांवर व सरकारवर निशाणा साधला आहे.


ठराविक लोकांनी टार्गेट केलं, आता पक्षश्रेष्ठींनी मला… आ. तांबेंनी दिले घरवापसीचे संकेत

बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजप सरकार फोडाफोडीचे राजकारण करून कुटील राजकारणाचा डाव खेळत आहे. परंतु जनता महाविकास आघाडीबरोबर आहे. सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.

‘त्रिशूळ’ सरकारला जनता देणार ‘दे धक्का’; लोकसभेसाठी जनता ‘मविआ’च्या फेव्हरमध्ये

भाजपच्या फोडाफोडीचे राजकारणामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी संतापाची लाट उसळली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल. त्यात काँग्रेस पक्षच आघाडीवर राहील असा दावा थोरात यांनी केला आहे.

ही जागा काँग्रेसकडे घेऊन बाळासाहेब थोरात यांनीच मैदानात उतरावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. आता थोरात यांनीच ही जागा काँग्रेसकडे मागितली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनीही ही जागा काँग्रेसकडे मागतिली आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात काँग्रेस कमजोर आहे. त्यात श्रीगोंद्यात नागवडे, नगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके यांची ताकद आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी मतदारसंघ मिळत नाही. त्यामुळे या भागात मतदारसंघ मिळविण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Tags

follow us