Download App

‘तलाठी भरती गैरप्रकारांचे ढीगभर पुरावे, सौ चूहे खा के बिल्ली चली हज को’; थोरातांचा विखेंना टोला

तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहे, जी समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल- बाळासाहेब थोरात

  • Written By: Last Updated:

Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe Patil: काही महिन्यांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भाष्य केलं. तलाठी भरतीत कोणताही गैरप्रकार झाला नाही. तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं थोरातांनी सिध्द केल्यास मी राजकारणातून बाजूला जाईल, जर ते भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असं आव्हान विखेंनी दिलं होतं. त्यावर आता थोरातांनी प्रत्युत्तर दिलं.

अहमदनगर जिल्ह्यातील नद्यांमध्ये विसर्ग वाढला, नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

 

आता विखे पाटील यांनी केलेल्या टीकेला बाळासाहे थोरातांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात लिहिलं की, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठवला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुध्दा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. याशिवाय, तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहे, जी समोर आली तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल, असा इशारा थोरातांनी दिला.

राजधानीत मराठीचा आवाज घुमणार, 70 वर्षांनी दिल्लीत होणार मराठी साहित्य संमेलन 

पुढं लिहिलं की, बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसुलमधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…. असं झालं आहे. आमदार रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्याच मीही पाठवतो, असं थोरात म्हणाले होते.

विखेंची टीका काय?
आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपांवर बोलतांना विखे म्हणाले की, तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला असा आरोप आपल्याच जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यावेळी माझ्यावर केले होते. मात्र, मला या गोष्टीचं समाधान आहे की, या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवाना नियुक्ती पत्र देऊन त्यांना मोठी चपराक विभागाने दिली. व्यवस्था बदनाम करण्याचा प्रयत्न झाला मात्र विभागाने चांगलं काम केलंय.

या तलाठी भरतीतील भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध करून दाखवावं, त्यांनी भ्रष्टाचार झाल्याच सिध्द केलं तर मी राकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी बाहेर जावं, असं चॅलेंज विखेंनी दिलं होतं.

follow us