Balasaheb Thorat News : अमोल खताळ यांना कोणीतरी बोलायला सांगतंय, ते माझी इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लेटस्अप मराठीशी बोलताना दिलंय. मुंबईत आज काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी लेटस्अप मराठीशी संवाद साधला.
दुचाकी चालकांसाठी नवा नियम! आता दोघांना हेल्मेट सक्ती, नियम मोडणाऱ्यावर होणार ‘ही’ कारवाई
बाळासाहेब थोरात म्हणाले, माझा पराभव सर्वांसाठी धक्कादायकच आहे. माझा पराभव निवडणूक आयोगाने जाहीर केलायं त्यामुळे मान्य करा अथवा न करो, काहीही फरक पडत नाही. मी 40 वर्षे आमदार, 18 वर्ष मंत्री प्रदेशचा अध्यक्ष, वर्किंग कमेटीचाही सदस्य होतो. अनेक मोठी कामे मी मार्गी लावली आहेत. ईव्हिएमबाबत संभ्रम आहे ,अनेक उमेदवारांना सारखरेच मते कसे पडले, असा सवाल बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलायं.
भाजपने चंदीगढमध्ये मतपत्रिकेत घोळ केला, ते काहीही करु शकतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा अभ्यास चांगला आहे. पवार हे संपूर्ण विचार करुनच बोलतात. आता काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेऊ त्या पद्धतीने आम्ही चालणार असल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय.
काँग्रेसच्या आमदारांना भविष्य राहिलेले नाही, त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हावे; आमदार देशमुखांचा सल्ला
पराभवानंतर भाजपचे आमदार अमोल खताळ यांच्याकडून बाळासाहेब थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. या आरोपांवर थोरात यांनी प्रत्युत्तर दिलंय. थोरात म्हणाले, सोशल मीडियावर कोणी काय बोलावं, याबाबत आम्हीच काय कोणी काहीही सांगू शकत नाहीत. माझ्यावर आरोप करण्याबाबत अमोल खताळ यांना कोणीतरी सांगत आहे, माझी इमेज डॅमेज करण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय.
Maharashtra Politics Live Update : मुख्यमंत्रीपदी भाजपचा चेहरा; एकनाथ शिंदेंचा पत्ता कट
आमदार खताळांनी काय आरोप केला?
धांदरफळ खुर्द हे माझं गाव आहे. धांदरफळ सभेतील विधान हे दुर्दैव्य होते. मी देखील त्याच सभेत होतो. पण ते वक्तव्य आले. त्या विधानाचे खंडन सुजय विखे यांच्यासह आम्ही सर्वांनी केले होते. परंतु या विधानाला आलेली रिअॅक्शन अपेक्षित नव्हती. कायद्याचा राज्य आहे. तक्रार द्यायची हवी होती”. परंतु ती रिअॅक्शन ‘प्री-प्लॅन’ होती. देशमुखांचे विधान आले नसते, तरी त्या कार्यक्रमामध्ये, सभेत सुजय विखे, माझ्यावर किंवा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी केलायं.