Download App

उद्धव ठाकरेंना दादा भुसेंचे प्रत्युत्तर, ‘एक रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य’

  • Written By: Last Updated:

Dada Bhuse on Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दौऱ्यात राज्य सरकावर जोरदार टीका केली होती. एक रुपयांत पीक विमा देण्याची योजना फसवी असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपाला दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे की एक रुपयांत पीक विमा ही योजना देणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.

मागील काही वर्षात पीक विम्यात सहभागी होण्याची शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्या हिश्याची रक्कम याचा विचार केला तर सरकारने ती जबाबदारी स्विकारली आहे. आता या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, असे दादा भुसे यांनी सांगितले.बीड जिल्ह्याचे पीक विम्याचे मॉडेल हे फक्त एका जिल्ह्यासाठी मर्यादित नाही. आता संपूर्ण राज्यासाठी राबवण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

जालना येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीसाठी मुंबईला आले होते. या बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीतून नक्कीच चांगल्या बाबी समोर येतील, असा विश्वास दाद भुसे यांनी व्यक्त केला.

‘बारामतीचा निकाल शून्य टक्के’; भर भाषणात अजित पवारांनी टोचले शिक्षकांचे कान…

गेल्या तीन-चार दिवसांत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची काय परिस्थती आहे याचा आढावा घेण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक होणार आहे, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.

शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून श्रेयवादाची लढाई, सरकारकडून अनावरणास स्थगिती; ठाकरे गटाची कोंडी!

ते पुढं म्हणाले की नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे होते. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एक मोहिम राबण्यात आली होती. या मोहिमेतून खड्डे बुजवण्यात यश आले आहे. शहरात अजून कोणत्या रस्त्यांवर खड्डे असतील तर ते देखील बुजवण्यात येतील. बुजवलेले खड्डे पुन्हा खराब झाले असतील तर महापालिका त्याची नोंद घेईल आणि चांगल्या प्रतिचे मटेरियल वापरले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us