Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) बिगुल वाजले, तशा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदारी टीका केली. सुपा एमआयडीसीमध्ये आज केवळ गुंडगिरी आणि दादागिरी सुरू आहे, लोकप्रतिनिधींकडून उद्योगजकांना धमकावल्या जातं, अशा शब्दात अजितदादांनी लंकेंवर निशाणा साधला.
Sonu Sood New Movie : ‘फतेह’ ची क्लिप लीक, चाहत्यांना मिळाली सोनू सूदची झलक
अजित पवार गटाची जन सन्मान यात्रेची सभा आज पारनेरमध्ये झाली. यावेळी बोलतांना अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, पारनेरमधून निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण, तुमच्यात एकवाक्यता ठेवा. तुमच्यात एकी नसेल तर दुसऱ्याचं फावेल. आपल्याला तालुक्याला पुढं न्यायचं आहे. तुम्ही एकी टिकवली तरच तुम्ही समोरच्या पराभूत करू शकता. नाहीतर आता खासदारकी त्याच्याकडे, आता तो आमदारकीही त्याच्याच घरात घ्यायला निघाला, जर दोन्ही एकाच घरात लं तर तुम्हला कोणी नसेल. त्यामुळं तुम्हीही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असं अजित पवार म्हणाले.
“जाट” मध्ये सुपरस्टार सनी देओलसोबत दिसणार विनीत कुमार सिंग, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट
सुप्यात फक्त गुडगिरी आणि दादागिरी
पुढं अजितदादा म्हणाले, सुप्याला एमआयडीसी आहे, त्यामुळं या भागाचा विकास झाला. मात्र, आज सुप्यात फक्त गुडगिरी आणि दादागिरी सुरू आहे. लोकप्रतिनिधींकडून उद्योगजकांना धमकावल्या जातंय. नुसती दमदाटी सुरू आहे. वाळू याच्याकडून घे, स्टील त्याच्याकडून घे, अशा धमक्या दिल्या जातात. इतरत्रही एमआयडीसी आहेत, मात्र, असा प्रकार कुठंच नाही, अशा शब्दात अजितदादांनी लंकेंवर टीका केली. सुप्यात कारखाने यायला तयार आहेत. वातारवण चांगलं ठेवा, असंही ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले, पारनेरकरांनो, तुम्ही चुकू केली तर त्याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. गाफील राहू नका, भावनिक राहू नका. घड्याळाच्या चिन्हाच्या उमेदवार निवडून द्या. तुमची पुढजी सगळी कामं मी मार्गी लावेल. कारण, आता केंद्र सरकारही आपल्या विचारांचे आहे, असं अजित पवार म्हणाले.