शिर्डी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (दि. 16) देवेंद्र फडणीसांचा ‘मी पुन्हा येईल’ चा पुनुरूच्चार करत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर देत अजितदादांसमोरचं पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रीय नेते अजूनही माझ्या मी पुन्हा येईलच्या दहशतीत असल्याचे देवेंद्र फडणीस (Devendra Fadanvis) यांनी शरद पवारांचे नाव न घेता म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून… : फडणवीसांचा इशारा
ऱाष्ट्रीय नेते अजूनही दहशततीत
दरम्यान, पवारांच्या कालच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस अजितदादांचे नाव घेत म्हणाले की, दादा मगाच्या काळात मी म्हणालो होतो की, मी पुन्हा येईल, त्याची दहशत अजूनही पाहायला मिळत आहे. अजून लोकं दहशततीत असून, काल राष्ट्रीय नेते म्हणाले की, ते फडणवीस म्हणाले होते ते पुन्हा येतील आणि आता मोदीची म्हणतायेत मग फडणवीस आले तर अशे आले. पण मी त्यांना एवढेच सांगतो की, ज्यावेळी मी म्हणालो पुन्हा येईल. त्यावेळी लोकांनी पुन्हा आणलं होतं पण, काही लोकांनी बेईमानी केली आणि म्हणून राज्य येऊ शकलो नाही. मात्र, ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली त्यांचा पूर्णं पक्ष घेऊनचं आम्ही आलो. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची शंका ठेवण्याची गरज नसल्याचे फडणवीस म्हणाले.
PM Vishwakarma Yojana : कारागिरांसाठी मोदी सरकारने आणले ‘अच्छे दिन’; जाणून घ्या योजना
काय म्हणाले होते शरद पवार?
काल (दि. 16) शरद पवारांची औरंगाबाद येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पवारांनी फडणवीसांच्या फेमस डायलॉगचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचाच आदर्श घेतला आहे. 2024 च्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांना भेटतीलच. मी पुन्हा येईन असं मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलंय खरं पण, पण फडणवीस त्याच पदावर पुन्हा आले नाहीत, तर ते खालच्या पदावर आल्याची बोचरी टीका पवारांनी बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेला आता फडणवीसांनी पवारांचे पुतणे अजित पवार यांच्यासमोरचं प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चांना सुरूवात झाली आहे.