Download App

Ahmednagar : देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याने विखे पाटील-शिंदेंच्या नात्यात ‘समृद्धी’ येणार?

अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सत्ताधारी-विरोधक ऐवजी सत्ताधारी पक्षामध्येच जुंपल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे (DCM Devendra Fadnavis) पाटील विरुद्ध भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील वादाने पक्षातील हेवेदावे उघड झाले आहेत. याच वादादरम्यान आता राज्य भाजपमधील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात विविध विकास कामांसोबतच अहमदनगर जिल्हा भाजपचा पदाधिकारी मेळावा देखील पार पडणार आहे. यामुळे आता फडणवीस यांच्या दौऱ्याने विखे-पाटील शिंदे यांच्या नात्यात समृद्धी येणार का? असा सवाल विचारला जात आहे. (DCM Devendra Fadnavis on Ahmednagar Visit Ram Shinde vs Radhakrishna vikhe Patil)

जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन राधाकृष्ण विखे आणि राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे अल्पावधीच या ठिणगीने आगीचे रुप धारण केले. राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. राम शिंदेंच्या आरोपात कोणतेही तत्थ नाही. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखेंनी यांनी केला होता.

AAP च्या एन्ट्रीने बिघडला खेळ! केजरीवाल-मोदी संघर्षात काँग्रेसचा सायलेन्स मोड

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांना एकत्र बसून वाद मिटवल्याचे सांगितले होते. एखाद्या विषयामध्ये मतमतांतर होऊ शकतं. त्याला संपूर्ण गटबाजी म्हणत नाही. स्थानिक पातळीवरील तो विषय आहे. मी तो पूर्णपणे सोडविला आहे. एवढा काही त्याच्यामध्ये बाऊ करुन घ्यायची गरज नाही, असं बावनकुळे यांनी सांगितले होते. यावर राम शिंदे यांनी आम्ही अजून एकत्र बसलो नाहीत. बोलवणार असतील असं वाटतं, असं म्हणतं थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनाच खोट पाडलं.

Sanjay Raut: ‘द डायरी ऑफ महाराष्ट्र खोका सरकार’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला : संजय राऊतांची निर्मिती

दरम्यान, आता पक्षातील अंतर्गत कलहाचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी जिल्ह्याचे प्रभारी असलेल्या फडणवीस यांना या वादावर तोडगा काढावा लागणार आहे. आज या दौऱ्यात या वादावर चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता आहे. नगर विधानसभेची जागा भाजपकडे घेण्याची स्थानिक नेत्यांची मागणी आहे. त्या दृष्टीनेही चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे भाजप पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्याचेही लक्ष लागले आहे.

Tags

follow us