Download App

साई संस्थान देशभरात उभारणार साईबाबांची मंदिरे; ग्रामस्थांचा मात्र कडाडून विरोध; आंदोलनाचा इशारा

राहाता : शिर्डी येथील श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टने (Saibaba Sansthan Trust) देशभरात साई मंदीर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांची सुविधा व्हावी आणि साईंचा प्रचार-प्रसार व्हावा यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी याबाबत माहिती दिली. मात्र शिर्डीच्या ग्रामस्थांकडून आणि नेत्यांकडून या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. त्यामुळे संस्थानचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. (decision of the Saibaba Sansthan Trust to build Sai Mandirs across the country is strongly opposed by the villagers and leaders of Shirdi)

श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टला एखाद्या राज्याने किंवा कोणत्याही संस्थेने पाच एकर जागा दिल्यास संस्थान तेथे शिर्डीसारखे मंदिर उभारणार आहे. हे मंदिर बांधण्यासाठी 50 लाखांपर्यंत मदत करणार आहे. तसेच तिथे अन्नदान, रुग्णसेवा आदी उपक्रमही राबविणार आहे. साईमंदिराची असोसिएशन काढण्यासारखे काही निर्णय विचारधीन होते, असे पी. शिवाशंकर यांनी हा निर्णय जाहीर करताना सांगितले.

Road Accident : भरधाव कंटेनर दुचाकीला धडकला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

मात्र या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थांसह साई भक्तातून विरोध होत असल्याचे दिसते. संस्थानच्या निर्णयाविरोधात माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी आंदोलनाचा तर माजी नगराध्यक्षा अनिता जगताप व विजय जगताप यांनी 5 ऑक्टोबरपासून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकरही आंदोलन करणार असल्याचे समजते. आधी शिर्डीतील रखडेलेल प्रकल्प आणि विकासकामे मार्गी लावा, असा दावा या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

गावोगावी विठ्ठलाची मंदिरे आहेत, तरीही वारकरी दरवर्षी पंढरपूरला येतातच. गावोगावी महादेवाची मंदिरे आहेत. तरीही अनेक शिवभक्त 12 ज्योतिर्लिंगला जातातच. तशीच साईंची मंदिरही ठिकठिकाणी आहेत. देशात सर्वात जास्त श्री. साईबाबांचीच मंदिरे आहेत. त्यामुळे या निर्णयाला विरोध करत आधी रखडेलेल प्रकल्प, विकासकामे मार्गी लागावीत. पाण्याची सोय करावी, भक्तांची सोय करावी, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, यानंतर संस्थान या निर्णयावर ग्रामस्थांचे एकमत घडून आणण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेणार असल्याचेही जाहिर केले आहे.

Weather Update : सावधान ! आजही मुसळधार पाऊस; हवामानाचा अंदाज काय ?

मात्र संस्थानने घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद आता शिर्डीसह साई भक्तांमध्ये उमटू लागले आहे.  संस्थानच्या या निर्णयाला विरोध असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमावर वायरल होत आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष तसेच संस्थानच्या कार्यकारी मंडळावर असणाऱ्या काही माजी सदस्यांनीही विरोधाचा सुर लावला आहे. एकुणच ग्रामस्थांच्या बैठकी आधीच संस्थानच्या या निर्णयाला विरोध होऊ लागल्याने हे लोन वाढण्याचीच चिन्हे निर्माण झाली आहेत.

Tags

follow us