Road Accident : भरधाव कंटेनर दुचाकीला धडकला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Road Accident : भरधाव कंटेनर दुचाकीला धडकला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. रोजच अपघाताच्या घटना घडत आहेत. आता अशीच हृदयद्रावक घटना मावळमधून समोर आली आहे. मावळच्या तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले.

याबाबत आधिक माहिती अशी, पती-पत्नीसह त्यांची दोन मुलं असे चौघे जण दुचाकीवरून चालले होते. तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवरून ते घरी निघाले होते. त्याचवेळी नानोली फाट्याजवळ असताना मागील बाजूने येणाऱ्या कंटेनरची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या धडकेत बाप आणि मुलगी जागीच ठार झाले. तर आई आणि मुलगा जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, दुचाकीवरून सगळे जण खाली पडल्यानंतरही कंटेनर थांबला नाही. त्यांच्या अंगावरून गेल्याची माहिती मिळत आहे.

Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना उपचारासाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव आंबी एमआयडीसी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या अपघातात कंटेनर न थांबता तसाच पुढे निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Road Accident : ट्रक रिक्षावर उलटला; भीषण अपघातात 4 ठार

मागील आठवड्यात भीषण अपघात झाला होता. पायी जाणाऱ्या तरुणीसह एका दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला. तरुणी पायी घरी चालली होती. त्याचवेळी एका दुचाकीवर दोघे जण आळेफाट्याच्या दिशेने जात होते. या दरम्यान भरधाव वेगातील पिकअप रस्त्याने चालला होता. या पिकअपने काही कळण्याच्या आतच रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या तरुणीसह दुचाकीलाही धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube