Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

Commercial LPG Cylinder : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच (Commercial LPG Cylinder) दिवशी सर्वसामान्य नागरिकांना टेन्शन देणारी बातमी आली आहे. नागरिकांना महागाईचा (Inflation) आणखी एक झटका बसला आहे. आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. तेल कंपन्यांना व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ केली आहे. या गॅस सिलिंडरचे दर 209 रुपयांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ही भाववाढ किरकोळ खाद्य विक्रेते, हॉटेल चालकांना धक्का देणारी ठरणार आहे. परिणामी खाद्य पदार्थांचे दर वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा यांसारखे मोठे सण आहेत. त्यातच या सणासुदीच्या दिवसात भाववाढ (Commercial LPG Cylinder) करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 209 रुपयांच्या वाढीनंतर राजधानी नवी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1731.50 रुपये झाली आहे. मुंबई शहरात 1684 रुपयांनी सिलिंडर मिळेल. याआधी 1 सप्टेंबरपासून एलपीजीच्या दरात 157 रुपये कपात करण्यात आली होती.

Commercial LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरनंतर मोदी सरकारचा आणखी एक दिलासा!

एक महिन्यापूर्वी सरकारने घरगुती गॅसच्या दरात जवळपास 200 रुपये कपात केली होती. यावेळी मात्र घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना किंमत कपातीचा फायदा मिळणार होता. पुढील काही महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुका आहेत. देशात 14.2 किलो एलपीजी सिलिंडरचे रेट याआधी मार्च 2023 मध्ये बदलले होते. त्यावेळी गॅसच्या किंमती 50 रुपयांनी वाढविण्यात आल्या होत्या. आज 1 ऑक्टोबर रोजी  तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅसचे दर मात्र स्थिर ठेवले आहेत. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये तर चेन्नईत 918.50 रुपये या दराने विक्री होत आहे.

सप्टेंबरमध्येही दरात केली होती कपात

दरम्यान, याआधी 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Cylinder ) किंमती कमी करण्यात आल्या होत्या. 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 157 रूपये कमी किंमतीत मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलेंडर हा 19 किलोंचा असतो. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी केल्याने अप्रत्यक्षपणे नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. आता मात्र या महिन्यात थेट दोनशे रुपयांनी वाढ करत सरकारने हा दिलासा फार काळ टिकू दिला नाही.

Commercial LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरनंतर मोदी सरकारचा आणखी एक दिलासा!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube