Road Accident : ट्रक रिक्षावर उलटला; भीषण अपघातात 4 ठार

Road Accident : ट्रक रिक्षावर उलटला; भीषण अपघातात 4 ठार

Road Accident : चंद्रपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना (Road Accident) समोर आली आहे. भरधाव वेगातील ट्रक ऑटो रिक्षाव उलटल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काल रात्री चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

धक्कादायक! देशात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण; WHO कडून आकडेवारी जाहीर

याबाबत आधिक माहिती अशी, भरधाव वेगातील ट्रक अष्टभूजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरून येत होता. त्याचवेळी अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक शेजारून चाललेल्य एका ऑटोरिक्षावरच उलटला. ट्रकखाली चिरडले गेल्याने चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. तसेच जे प्रवासी जखमी झाले होते त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, महामार्गांवर वाहने भरधाव वेगात असतात. वेग नियंत्रित नसतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Road Accident : भीषण अपघात ! खासगी बस पुलाखाली कोसळली; 25 जण जखमी

चारच दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. पायी जाणाऱ्या तरुणीसह एका दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला. तरुणी पायी घरी चालली होती. त्याचवेळी एका दुचाकीवर दोघे जण आळेफाट्याच्या दिशेने जात होते. या दरम्यान भरधाव वेगातील पिकअप रस्त्याने चालला होता. या पिकअपने काही कळण्याच्या आतच रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या तरुणीसह दुचाकीलाही धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube