Download App

Dhangar Reservation: उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, महाजनांनी घेतली भेट, विखेंच्या न येण्याचं रहस्यच

  • Written By: Last Updated:

Dhangar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर झाला असून चौंडी येथे धनगर आरक्षणासाठी काही तरूणांनी गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यातच या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या उपोषणकर्त्याची मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप देखील उपोषण कर्त्यांची भेट घेतली नाही. यावर मंत्री महाजन यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की विखे आले की नाही हे मला माहित नाही. मात्र मला वाटलं की त्यांनी भेट घेतली असेल.

धनगर आरक्षणाकडे सरकारचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून होत आहे. अण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावत आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेतली.

उपोषणकर्त्यांची प्रकृती ठीक असून अकरा दिवस उपोषण केल्याने त्यांच्या वजनात मोठी घट झाली आहे मात्र त्यांचे वैद्यकीय अहवाल ठीक आले आहेत. उपोषण सोडावे ही विनंती केली तसेच चौंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेणार, असे महाजन यांनी सांगितले.

अजित पवारांनंतर शरद पवारांचेही पुण्यात शक्तिप्रदर्शन; ‘या’ तारखेला रोड शो…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. येत्या दोन दिवसांत याबाबत काय निर्णय घेता येईल यावर मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले.

केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता, पण…; शेतकरी आत्महत्येच्या अहवालावर फडणवीस स्पष्टच बोलले

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा मुद्दा आपण पुढे नेला आहे. आता तांत्रिक अडचणी दूर होत आल्या आहेत लवकरच मंत्री मंडळाची बैठक घेत यावर चर्चा केली जाईल, असे महाजन यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वीच मी याठिकाणी येणार होतो मात्र जालन्यातील उपोषणामुळे मला येण्यास विलंब झाला. मात्र येत्या दोन दिवसात मंत्री मंडळाच्या बैठकीत यावर काय तो निर्णय घेऊ, असे महाजन यांनी सांगितले.

Tags

follow us