केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता, पण…; शेतकरी आत्महत्येच्या अहवालावर फडणवीस स्पष्टच बोलले

  • Written By: Published:
केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता, पण…; शेतकरी आत्महत्येच्या अहवालावर फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis on Sunil Kendrekar : शेतकरी आत्महत्या (Farmer suicide) हा चिंतेचा विषय बनला असून या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील १० लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. ज्यामध्ये एक लाखाहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले होतं. यावरून सरकरामधील काही लोकांनी केंद्रेकरांवर टीका केली होती. दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं. आहे. केंद्रेकरांनी चांगले काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या अहवालाचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

छ. संभाजीनगर मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना सुनील केंद्रेकरांच्या अहवालावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, निवृत्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा अहवाल अधिकृत समितीचा अहवाल नव्हता. पण, त्यांनी चांगले काम केले आहे, त्यामुळे केंद्रेकर यांनी दिलेल्या अहवालाचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Aatmapamphlet Trailer : अतरंगी अन् तिरकस विनोदी प्रेमकथा;’आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 

फडणवीस म्हणाले, केंद्रेकरांनी चांगलं काम केलं आहे. त्यांची जी मतं आहेत, किंवा कशाप्रकारे यातून त्यांना बाहेर काढता येईल यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. मुख्यमंत्र्यांनी आत्ता ज्या काही उपाययोजना जाहीर केल्या, त्या यानुसारच संबंधित आहेत. उदाहरणार्थ, दुभती जनावरं देणं. या योजनेत आपण मराठवाड्यातील सर्वच गावांचा समावेश करत आहोत. त्यामुळं त्यांनी जो अहवाल दिलेला आहे, त्या अहवालाचाही आम्ही गांभीर्याने विचार करू, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रेकरांनी दिलेल्या अहवालानुसार एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरू असल्याचं म्हटलं आहे. या अहवालावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रश्न उपस्थित केले होते. हा अहवाल जर खोटा ठरल्यास केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहीजे, असे शिरसाट म्हणाले होते. मात्र, आज पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे सांगितले.

केंद्रेकरांचा अहवला काय सांगतो?
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांची माहिती भरण्यात आली होती. सर्वेक्षणादरम्यान प्रश्नांचे एकूण बारा विभाग तयार करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकूण 104 प्रश्नांची माहिती भरुन घेण्यात आली. यात आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. एकूण 10 लाख शेतकरी कुटुंबांपैकी 1 लाख 5 हजार 754 शेतकरी कुटुंबे अतिसंवेदनशील यादीत आहेत. म्हणजेच ते आत्महत्या करण्याच्या विचारारत असल्याचं समोर आलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube