Download App

Dhangar Reservation : मोठी बातमी! राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, धनगर आरक्षणासाठीचं चौंडीतील उपोषण मागे

  • Written By: Last Updated:

Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. या दरम्यान अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाकडून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात आले होते.

राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश…

मात्र आज अखेर पाचव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. उपोषणकर्ते व सरकार यांच्यात आमदार प्रा.राम शिंदे यांनी यशस्वी मध्यस्थी घडवून आणल्याने हे उपोषण पाचव्या दिवशी सुटले. त्यामुळे राम शिंदेना यश आले आहे. यशवंत सेनेने याआधी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे 21 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी सरकारने लिखित आश्वासन दिले होते. परंतु, सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप करत यशवंत सेनेने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते.

Sangram Jagtap : …तर उपोषणाला बसणार! आमदार जगतापांचा पोलीस प्रशासनाला इशारा

धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने हाती घेण्यात आलेले उपोषणाचे अंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी यशवंत सेनेचे पदाधिकारी व प्रांताधिकारी नितिन पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक महेश पाटीलसह आदी उपस्थित होते.

India vs Australia: दावेदार असूनही ‘या’ खेळाडूला टीम इंडियात स्थान नाही

राज्यात मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणबाबत आंदोलन आणि उपोषण तीव्र झाले होते. सोलापूर येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला होता. त्यानंतर चौंडी येथे धनगर समाज उपोषणाला बसला होता. हे उपोषण सोडण्यासाठी सरकारच्या वतीने राम शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला होता. धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता पुन्हा धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्याने हे उपोषण सुरू होते. मात्र उपोषणकर्ते व सरकार यांच्यात आमदार प्रा.राम शिंदे यांनी यशस्वी मध्यस्थी घडवून आणल्याने हे उपोषण पाचव्या दिवशी सुटले.

Tags

follow us