गरिबांना दिवाळी साहित्याचे वाटप; विकास पालवे मित्र परिवाराचा उपक्रम

Diwali 2025-अहिल्यानगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक शिरीष वामने, तहसीलदार स्वप्नील ढवळे, उद्योगपती अक्षय चव्हाण, विकास पालवे यांच्या हस्ते हे वाटप झाले.

Vikas Palve Mitramandal

Vikas Palve Mitramandal

Diwali 2025: दिवाळी सण (Diwali 2025) गोरगरीबांना साजरी करता येत नाही. त्यामुळे नगरमधील विकास पालवे मित्र परिवाराकडून गरीबांना दिवाळी फराळ तयार करण्याचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. अहिल्यानगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक शिरीष वामने, तहसीलदार स्वप्नील ढवळे, उद्योगपती अक्षय चव्हाण, विकास पालवे यांच्या हस्ते हे वाटप झाले.

भिंगारमधील इंद्रानगर झोपडपट्टीमधील गरिब नागरिक, दरेवाडी, नगरमधील रस्त्याच्या कडेचे कचरावेचक, भिकारी यांना फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व साहित्य मिळून सहा किलोची किट देण्यात आली. त्यात साखर, तांदूळ, चनाडाळ, तेल असे साहित्य होते. तर लहान मुलांना कपडेही देण्यात आले. गरीब नागरिकांना 200 किटचे वाटप करण्यात आले आहे. विकास पालवे मित्र परिवारामुळे गरिबांची दिवाळी गोड झाली असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (Distribution of food grains to the poor; Initiative of Vikas Palve Mitra Mandal)

Exit mobile version